LIVE UPDATES

कोकणातून अधिकारी घडवणे हेच ध्येय असून शेवटच्या श्वासापर्यंत कोकणासाठी काम करणार

निलेश सांबरे यांचा निर्धार : जिजाऊ संघटनेतर्फे दोडामार्ग तालुक्यातील माध्यमिक शाळांमध्ये मोफत वह्यांचे वाटप
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 21, 2026 08:43 PM
views 118  views
Jijau Organization distributes free notebooks to school students in Dodamarg Sindhudurg under Nilesh Sambare's initiative.

दोडामार्ग : "कोकणातील विद्यार्थ्यांनी, विशेषतः विद्यार्थिनींनी अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहावे. या विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिजाऊ संस्था सदैव त्यांच्या पाठीशी उभी राहील. कोकणातून परिवर्तन घडवणे हेच माझे ध्येय असून, शेवटच्या श्वासापर्यंत मी कोकणासाठी काम करत राहीन असे आश्वासन जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी दिले.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र व जिजाऊ संघटना, सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने दोडामार्ग तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या "संपूर्ण कोकणात ३५ लाख वह्या वाटप" या संकल्पांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला असून दोडामार्ग तालुक्यातील दोडामार्ग इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, श्री नवदुर्गा माध्यमिक विद्यालय, आई, माध्यमिक विद्यालय, माटणे, माध्यमिक विद्यालय, मांगेली, न्यू इंग्लिश स्कूल अँड आर्ट्स, कॉमर्स ज्युनिअर कॉलेज, भेडशी, करुणा सदन इंग्लिश मीडियम स्कूल, साटेली, एम. आर. नाईक विद्यालय, कोनाळकट्टा, माध्यमिक विद्यालय, सोनावल, कीर्ती विद्यालय, घोटगेवाडी, न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्क महाविद्यालय, भेडशी या शाळांमध्ये वह्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमांला माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक संतोष नानचे, माजी सरपंच व विद्यमान नगरसेवक पांडुरंग बोरडेकर, साटेलीच्या सरपंच छाया सखाराम धरणे, पंचायत समिती सदस्य संजय सरडेकर, भाजपा सरचिटणीस सिद्धेश पांगम, सामाजिक कार्यकर्ते सुभाष गवस, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नारायण मनोहर खांबळ, तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष आदिलकर, सुशांत राऊत, संतोष म्हावळणकर व सत्यवान गवस यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

नवीन कोऱ्या वह्या हातात पडताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ही मदत मोलाची असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. शिक्षक व ग्रामस्थांनी जिजाऊ संस्थेच्या या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिजाऊ संघटनेचे ओमकार तिवरेकर, वैभव मसणे व ज्ञानेश्वर नेवरेकर यांनी काटेकोर नियोजन केले.