
मुंबई : रसिक प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी घेऊन येणाऱ्या ‘हे जीवन सुंदर आहे’ या कार्यक्रमाच्या भाग २० चे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके यांच्या बहारदार गीतांसह लावण्यांचा कराओके ऑर्केस्ट्रा सादर केला जाणार आहे.
हा कार्यक्रम ३ डिसेंबर २०२६ रोजी, गुरुवारी दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बोरिवली पश्चिम येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, मिनी हॉल, चौथा मजला येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजिका अॅड. हर्षा चौकेकर असून कार्यक्रमाची संकल्पना भाई महाडेश्वर यांची आहे.
व्यवस्थापक म्हणून नारायण बांदेकर, तर कार्यवाहक म्हणून चंद्रमोहन रेनिकुंठा जबाबदारी सांभाळणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन रुपेश कदम करणार आहेत. कार्यक्रमात मंदाकिनी गांगुर्डे, प्राजक्ता आजगावकर, नीलम मोहीते, अरुंधती कुंभार, हर्षा चौकेकर, उर्मिका अंसूरकर, गणेश कोंडकर, भाई महाडेश्वर आणि नारायण बांदेकर हे गायक आपल्या सादरीकरणातून रसिकांचे मनोरंजन करणार आहेत.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








