LIVE UPDATES

‘घन बरसत बरसत आले’ सावंतवाडीत संगीत कार्यक्रमाचे आयोजन

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 24, 2026 17:42 PM
views 225  views

सावंतवाडी : श्री सद्गुरू संगीत विद्यालय सावंतवाडी यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिमासिक संगीत सभेअंतर्गत ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या गीतांवर आधारित ‘घन बरसत बरसत आले’ या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम शनिवार, २७ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता सावंतवाडी येथील आर. पी. डी. हायस्कूल सभागृह येथे होणार आहे. श्रीनिवास खळे यांच्या अजरामर गीतांचा सुरेल आविष्कार या कार्यक्रमातून रसिकांसमोर सादर केला जाणार आहे. कार्यक्रमाची निर्मिती व संकल्पना निलेश मेस्त्री यांची असून श्री सद्गुरू संगीत विद्यालयाचे यशस्वी विद्यार्थी या कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत. संगीतप्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.