LIVE UPDATES

वयाच्या 42 व्या वर्षी अभिनेत्री झाली आई, गुरु पौर्णिमेच्या दिवशी मुलाला दिला जन्म

Karishma Tanna : अभिनेत्री करिश्माने पती वरुणसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली. करिश्माने बाळाच्या पावलांचा एक फोटो पोस्ट केला.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 30, 2026 17:17 PM
views 162  views

Karishma Tanna Baby News : वयाच्या 42 व्या वर्षी टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा तन्नाने एका गोंडस मुलाला गुरु पौर्णिमेच्या शुभमूहूर्तावर जन्म दिला आहे. याबाबतची माहिती करिश्मा आणि तिचे पती उद्योगपती वरुण बंगेरा यांनी सोशल मिडियावर पोस्ट शेअर करीत दिली आहे. यामुळे अभिनेत्री करिश्माच्या घरी आनंदाचे वातावरण आहे.

अभिनेत्री करिश्माने पती वरुणसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली. करिश्माने बाळाच्या पावलांचा एक फोटो पोस्ट केला. ज्यामध्ये बाळाच्या आगमनाची घोषणा करणारा एक टॅग होता. या फोटोसोबत तिने लिहिले, "गुरुपौर्णिमेच्या शुभ दिवशी आम्हाला सर्वात मोठा आशीर्वाद मिळाला आह. २९ जुलै २०२६ रोजी आमच्या छोट्याश्या जगात तुझे स्वागत आहे."

करिश्माच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. स्मृती इराणी, खुशी कपूर, नेहा धुपिया आणि अनुष्का रंजन यांच्यासह अनेक कलाकारांनी तिचे अभिनंदन केले आणि बाळाचे स्वागत केले. विशेष म्हणजे, करिश्मा या क्षणाची बऱ्याच काळापासून आतुरतेने वाट पाहत होती. तिने अनेकदा तिचे 'बेबी बंप' चे फोटो शेअर केले होते.

करिश्मा आणि वरुण २०२१ पासून एकमेकांना डेट करत होते आणि ५ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांनी लग्न केले. त्यांच्या लग्नाला केवळ कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. करिश्माने २०२३ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'स्कूप' मधील तिच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. या मालिकेचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले होते. या शोने 'आशिया कंटेंट्स अवॉर्ड्स अँड ग्लोबल ओटीटी अवॉर्ड्स'मध्ये 'सर्वोत्कृष्ट आशियाई टीव्ही मालिका' हा पुरस्कारही जिंकला. 'स्कूप'नंतर करिश्मा अनन्या पांडेच्या 'कॉल मी बे' या प्रोजेक्टमध्ये दिसली.