LIVE UPDATES

CJP आंदोलनावर येणार चित्रपट

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 04, 2026 11:41 AM
views 73  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news# cjp protest

नवी दिल्ली : देशभरात चर्चेत राहिलेल्या CJP (कॉकरोच जनता पार्टी) आंदोलनावर आता चित्रपटाची निर्मिती होणार आहे. या चित्रपटाचे नाव 'द ॲक्सिडेंटल कॉकरोच पार्टी' (The Accidental Cockroach Party) असे निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नीट (NEET) पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांचे आंदोलन, जंतर-मंतरवरील घडामोडी आणि त्यामागील राजकीय तसेच सामाजिक घटनाक्रम मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जाणार आहे. अहवालानुसार, चित्रपटाचे अंदाजे बजेट सुमारे 20 कोटी रुपये असणार असून, कलाकार आणि प्रदर्शित होण्याच्या तारखेबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

या चित्रपटामुळे CJP आंदोलनाची कथा आणि त्यामागील घटनांबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली असून, पुढील काळात निर्मात्यांकडून अधिक माहिती जाहीर होण्याची अपेक्षा आहे.