
सावंतवाडी : मुंबई विद्यापीठाच्या सहाव्या सत्राच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनीअरिंग तसेच कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. दोन्ही विभागांतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सीजीपीए मिळवत आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची छाप पाडली आहे.
तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनीअरिंग विभागात नूतन नंदकिशोर गावकर हिने 10.00 सीजीपीए गुण मिळवत विभागात प्रथम क्रमांक पटकावला. गायत्री गणपत भैरवकर हिने 9.87 सीजीपीए मिळवत द्वितीय क्रमांक तर मिताली मनोहर कांबळी हिने 9.61 सीजीपीए मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागात ज्योती विजय नाटेकर हिने 9.87 सीजीपीए मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.
वेदांत विनय पास्ते याने 9.74 सीजीपीए मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला. वैष्णवी सूर्यकांत डांगी, प्रणव विवेक सडवेलकर आणि उत्कर्ष विश्वनाथ परुळेकर या तिघांनीही 9.61 सीजीपीए मिळवत संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळविला. या यशाबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीला आणि यशाला संस्थेच्या शैक्षणिक वातावरणाची लाभलेली साथ या कामगिरीतून अधोरेखित झाली आहे.










