
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल हद्दीतील शासनाच्या सर्व कार्यालयांसाठी सन 2026 करिता तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार दि. 17 ऑगस्ट रोजी नागपंचमी, 18 सप्टेंबर रोजी ज्येष्ठागौरी पूजन आणि 9 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी (धन्वंतरी जयंती) या दिवशी स्थानिक सुट्टी राहणार आहे. याबाबतची अधिसूचना सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी यांनी जारी केली आहे.










