
सिंधुदुर्ग : वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनविभागाच्या संबंधित विविध प्रश्नांवर सकारात्मक बैठक पार पडली. यावेळी माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास राव यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीमध्ये आजरा घाटघर येथे हत्ती ग्राम तयार करण्यासाठी रु. 90 कोटींची तरतूद करण्याची मंजूर देण्यात आली. तिलारी राखीव वन्य क्षेत्रात आवश्यक ते खाद्य तयार करून पूर्ण क्षेत्रात फेन्सिंग करून हत्तींचा अधिवास तयार करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश करण्यात आले. यासाठी रु. 12 कोटीची तरतूद करण्यात आली.
झाडे व फळे यांची सध्या मिळत असलेली नुकसान भरपाई कमी असल्याने ती वाढून देण्यात आल्याचा निर्णझा तत्वता झाला. बांबू हे गवत असल्याचे वर्णन वन विभागामध्ये असल्याने त्याची नुकसान भरपाई मिळत नसल्याने ते बांबू वनस्पतीमध्ये समाऊन त्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे तत्वाचा मान्य करण्यात आली. फळांमध्ये फणस व काजूचे बोंड यांची नुकसान भरपाई मिळत नसल्याने त्याचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. वनक्षेत्रांमध्ये सर्प दोषाने जीवितहानी झाली तर त्याला हत्तीप्रमाणे रु. 25 लाख रुपये मदत दिली जाईल असा निर्णय घेण्यात आला. यावेळी दोडामार्ग उपसभापती गणेशप्रसाद गवस, राजू निंबाळकर, गोपाळ गवस, राजन मोर्ये, गिरीश परब आदींसह वन अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.










