करिष्मा कपूर हिचे घटस्फोटीत पती संजय कपूर यांचं निधन

Edited by:
Published on: June 14, 2025 16:10 PM
views 243  views

बॉलीवूड अभिनेत्री करिष्मा कपूर हिचे घटस्फोटीत पती संजय कपूर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 53व्या वर्षी त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची माहिती मिळत आहे. पण, त्यांच्या मृत्यूमागे फक्त हार्ट अटॅक हे एकमेव कारण नाहीतर, आणखी एक धक्कादायक कारण समोर आलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूरचे घटस्फोटीत पती आणि बिझनेसमन संजय कपूर यांच्या निधनाच्या वृत्तानं सर्वांनाच धक्का बसला. लंडनमध्ये पोलो खेळत असताना हार्ट अटॅकमुळे 53 वर्षांच्या बिझनेसमनचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पण, संजय कपूर यांच्या मृत्यूसाठी फक्त हार्ट अटॅकच नाहीतर, आणखी एक धक्कादायक कारण समोर आलं आहे. संजय कपूर लंडनमध्ये पोलो खेळत असताना एक मधमाशी त्यांच्या तोंडात गेली आणि तिनं चावा घेतला. त्यानंतर संजय कपूर यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. मात्र अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये.

संजय कपूर व्यवसायिक होते. ते सोना कॉमस्टारचे चेअरमेन होते आणि भारतीय ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीचा प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जायचे. त्यांना पोलो खेळण्याची फार आवड होती. तसंच, ते पोलो टीमचे मालकदेखील होते.

संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचे लग्न 2003 साली झाले होते. जवळपास 13 वर्षांनी, 2016 मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2017 साली संजय कपूर यांनी प्रिया सचदेवशी दुसरे लग्न केले. गेल्या आठ वर्षांपासून ते दोघं एकत्र सुखाने संसार करत होते.