ब्युरो न्युज : बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे ही लोकप्रिय अभिनेत्री सोशल मीडियावर active असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. करिअरविषयी बोलायचे झाले तर पूजा चांगल्या ट्रॅकवर काम करत आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत पूजाची जवळीकता वाढत असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार याविषयी कोणताही पुरावा नाही. दरम्यान, अशा चर्चा सुरु झाल्या असून त्यावर चाहत्यांनी प्रतिक्रियाही दिली आहे. उमेर संधू नावाच्या स्वयं घोषीत चित्रपट समीक्षकानं या अफवेला दुजोरा दिला आहे. सलमान खान आणि पूजा हेगडे हे नवीन हॉट कपल असल्याचं उमेर संधूनं ट्विट करत म्हटले आहे. त्यानं ट्विट करत म्हटले की, 'ब्रेकिंग न्यूज: नवीन कपल!!! मेगा स्टार #SalmanKhan #PoojaHegde च्या प्रेमात आहे!! त्याच्या प्रोडक्शन हाऊसनं तिला पुढील 2 चित्रपटांसाठी साइन केले आहे!! ते दोघे आजकाल एकमेकांसोबत बराच वेळ व्यथित करताना दिसतात!! सलमानच्या जवळच्या सूत्रांनी या बातमीला दुजोरा दिल्याचे यावेळी म्हटले आहे.