'एम. जे. डान्स अकॅडमी'च्या वर्धापन दिनानिमित्त नृत्याविष्कार सोहळ्याचे आयोजन

Edited by: विनायक गांवस
Published on: May 13, 2026 16:05 PM
views 14  views

सावंतवाडी : जिल्ह्यातील मुलांमध्ये उपजतच टॅलेंट आहे. कला, क्रीडा, प्रत्येक क्षेत्रात ही मुले आपली चमक दाखवत आहेत. मात्र, आपल्या पाल्याला यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचवण्यासाठी पालकांनी केवळ प्रेक्षक न राहता, त्यांच्या कलागुणांना सकारात्मक प्रोत्साहन देऊन पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक अकीना मिश्रा यांनी केले. सावंतवाडीतील 'एम. जे. डान्स अकॅडमी'च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष नृत्याविष्कार सोहळ्यात त्या मुख्य अतिथी म्हणून बोलत होत्या.

यावेळी ओंकार कलामंचाचे अध्यक्ष अमोल टेंबकर, युवा पत्रकार प्रणव तारी, मुंबईचे प्रसिद्ध कोरिओग्राफर प्रशांत दळवी, नीक तिमानिया, लावणी किंग घनशाम सोनवणे एम जे डान्स अॅकेडमीचे संचालक महेश जांभोरे, स्नेहल जांभोरे आदी उपस्थित होते. मिश्रा म्हणाल्या, आजच्या स्पर्धेच्या युगात आणि रियालिटी शोच्या वाढत्या व्यापात मुलांमधील सुप्त गुण ओळखणे महत्त्वाचे आहे. कोकणातील मातीतील हे कलाकार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची क्षमता ठेवतात. जर पालकांनी मुलांच्या आवडीला ओळखून त्यांना योग्य वयात योग्य मार्गदर्शन आणि पोषक वातावरण उपलब्ध करून दिले‌ तर ही मुले नक्कीच जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करतील. केवळ ग्लॅमरकडे न पाहता कलेचा पाया मजबूत करण्यासाठी पालकांनी मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे आयोजक आणि अकॅडमीचे संचालक महेश जांभोरे यांनी यावेळी यशाचा मंत्र दिला. 

यावेळी कुडाळच्या डॉ. शरावती शेट्ये, शैलेश सोन्सुरकर  श्रीशा सोनसुरकर, चित्रा भिसे, सुरेखा रायका, पल्लवी रेगे, निवेदक निलेश गुरव, प्रवीण गावडे, पी. के. नृत्य अकादमी कुडाळचे प्रसाद कामतनुरे, एस. के. डान्स अकादमी कणकवलीचे संजय कांबळे आणि उदय कुंभार यांसारख्या मान्यवरांनी उपस्थित होती.  हा सोहळा यशस्वी करण्यासाठी  कोरिओग्राफर सावन जांभोरे, सोहम जांभोरे, रुतिक ठाकरे, सागर पाटील, किरण नाईक, गुरु तुळसकर, भार्गवी पांगम, नम्रता वाटवे, शौर्य सोनसुरकर, अन चिली, सानिका नार्वेकर आणि सुविधा कलंगुटकर आदींनी मेहनत घेतली.