LIVE UPDATES

Pune Crime : पूर्व वैमन्यासातून पुण्यात तरुणावर गोळीबार

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 24, 2026 19:08 PM
views 75  views

पुणे : पुण्यातील घोरपडे पेठ परिसरात एका तरुणावर पूर्व वैमन्यासातून फायरिंग झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेमध्ये नूरु शेख हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत . ही घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलीस चौकीसमोरच घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे . पोलिसांनी एकूण पाच संशयिताना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे .