LIVE UPDATES

'एमपीएससी 'मार्फत 5 हजार 707 पदांसाठी भरती

विविध विभागात सरकारी नोकरीची संधी ; 5 ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 23, 2026 16:41 PM
views 69  views

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) पदभरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.  एमपीएससीने याबाबतची जाहिरात प्रसिध्द केली आहे. गट क पदभरतीसाठी 25 जूनला काढलेल्या जाहिरातीत 2 हजार 619 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार होती. दरम्यान, नवीन मागणीपत्र आल्याने या पदाच्या सख्यांमध्ये 3 हजार 88 पदांची वाढ झाली आहे. त्यामुळे एमपीएससीमार्फत एकूण 5 हजार 707 पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या पदभरतीमध्ये कर सहायक पदाच्या २८२ जागा, सहायक मोटार वाहन निरीक्षक गट क पदाच्या ४६१ जागा, तर लिपिक-टंकलेखक पदाच्या १ हजार ८६४ जागा, महसूल आणि वन विभागातील तलाठी पदाच्या १५३९, तांत्रिक सहायक पदाच्या 3 जागा, उद्योग निरीक्षक पदाच्या ९ जागा, आदिवासी विकास विभागातील लिपिक व टंकलेखक पदाच्या ६१ जागा, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगातील वरिष्ठ लिपीक-अभिलेखापाल पदाच्या ११ जागा, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील लिपिक व टंकलेखक पदाच्या १५५ जागा, नोंदणी आणि मुद्रांक विभागातील लिपिक व टंकलेखक पदाच्या ३३९ जागा, सहायक अधीक्षक पदाच्या ११ जागा, नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयातील लिपिक व टंकलेखक पदाच्या २३० जागा, महसूल आणि वन विभाग या विभागातील लिपिक व टंकलेखक पदाच्या ४८० जागा, कृषी आणि पदुम विभागातील सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी पदाच्या २५४ जागांचा समावेश आहे.

जा. क्र. ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संवर्गांसह एकूण ५७०७ पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल. पदसंख्येतील बदल आणि अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात…

— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) July 22, 2026 " target="_blank">

अशी होणार भरती प्रक्रिया

इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट असणार आहे. पात्र उमेदवारांची ऑफलाईन किंवा ओएमआर पध्दतीने 25 ऑक्टोंबर रोजी परीक्षा घेतली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. परीक्षेसाठी उमेदवारांना केवळ यूपीआय किंवा कार्ड अशा ऑनलाईन पध्दतीनेच शुल्क भरावे लागणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. इच्छूक उमेदवारांनी एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात पाहूनच अर्ज करावा.