LIVE UPDATES

India us tariff : अमेरिकेने भारतावर लादले १० टक्के आयात शुल्क

भारतासह ६० व्यापारिक देशांवर टॅरिफ लागू : भारतीय उत्पादने अमेरिकामध्ये होणार महाग
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 24, 2026 16:16 PM
views 91  views
US imposes 10 Percent import duty on India

मुंबई : अमेरिकाने भारताततून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त १० टक्के शुल्क (Traiff) लागू करण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय शुक्रवारी अंमलात आला. अमेरिकेने भारतासह ६० व्यापारिक देशांवर टॅरिफ लागू करण्यात आले आहे. याबाबतची माहिती युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह कार्यालयाने दिली. अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींनी फोर्स्ड लेबरचा वापर करुन उत्पादन केलेल्या वस्तूंच्या आयातीबाबत 60 देशांविरुध्द ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, अतिरिक्त शुल्क लागल्याने भारतीय उत्पादने अमेरिकामध्ये महाग होणार आहेत. यामध्ये टेक्सटाईल आणि गारमेंट्स, हिरे आणि दागिने, चामड्याच्या वस्तू, कृषी व खाद्यपदार्थ, अभियांत्रिकी उत्पादने, रसायने आणि काही उत्पादन क्षेत्रातील वस्तूंचा समावेश आहे. तेल आणि गॅस, खते, काही खाद्यपदार्थ, स्टील, ॲल्युमिनियम, कॉपर, ऑटोमोबाईल आणि अमेरिका-मेक्सिको-कॅनडा करारानुसार 'ड्युटी-फ्री' असलेल्या उत्पादनांना नवीन शुल्कातून वगळण्यात आले आहे.

'एएनआय'ला अमेरिकन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला भारतावर १२.५ टक्के शुल्क प्रस्तावित होते. दरम्यान, परंतु फोर्स्ड लेबरबाबत झालेल्या महत्त्वपूर्ण चर्चेनंतर, 'कलम ३०१' (Section 301) अंतर्गत भारतासाठी १० टक्के शुल्क निश्चित करण्यात आले. युनायटेड किंगडम, बांगलादेश, पाकिस्तान, मेक्सिको, मलेशिया, इंडोनेशिया, कॅनडा, कंबोडिया, जॉर्डन, अर्जेंटिना, इक्वेडोर, श्रीलंका, एल साल्वाडोर, त्रिनिदाद, ग्वाटेमाला, होंडुरास आणि टोबॅगो या देशांचा १० टक्के शुल्काच्या श्रेणीमध्ये समावेश आहे.

'युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह'  कार्यालयाने स्पष्ट केले की, हे उपाय शुक्रवारी पहाटे १२:०१ पासून अंमलात येतील. भारतासह ६० देशांवर किमान १० टक्के शुल्क लादण्यात आले आहे, तर काही देशांसाठी हा दर १२.५ टक्के पर्यंत आहे. भारताचा समावेश १० टक्के शुल्क श्रेणीमध्ये होतो. हे शुल्क विद्यमान आयात शुल्काची जागा घेत असल्याने, भारतावर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही.