LIVE UPDATES

शिरगाव शिंदेवाडी येथे घरगुती वादातून महिलेला धमकी व शिवीगाळ

संशयित पती-पत्नीविरूध्द गुन्हा दाखल ; दाेन्हीही संशयित पनवेलचे
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 22, 2026 20:34 PM
views 35  views

देवगड : घरगुती वादातून महिलेला धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी आरती दिपक शिंदे (50) रा.पनवेल व दिपक वसंत शिंदे (52) रा.पनवेल या संशयित पती-पत्नी विरूध्द देवगड पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 15 जुलै राेजी दुपारी 3 वा.सुमारास शिरगाव शिंदेवाडी येथे घडली.

देवगड पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, या घटनेतील पीडीत महिलेचे माहेर शिरगाव शिंदेवाडी येथे आहे. पीडीत महिलेची आई मयत झाल्याने ती शिरगाव शिंदेवाडी येथे राहण्यास गेली हाेती. आईचे दिवसकार्य सुरू असल्याने सर्व नातेवाईक तेथे घरी आले हाेते. यावेळी संशयित आरती शिंदे हिने पीडीतेला आईच्या मालकीचे घर मला हवे, तुम्ही येथून निघून जा. असे सांगून वाद घातला तसेच संशयितेने पीडीतेच्या अंगावर धावत येवून कुटूंबाला शिवीगाळ करून हात पाय ताेडून टाकेन अशी धमकी दिली. तर संशयित दिपक शिंदे याने पीडीता व तिच्या बहिणीच्या अंगावर धावत जावून तुम्हाला व कुटूंबियांना खपवुन टाकेन अशी धमकी दिली. तसेच पीडीतेच्या मनात लज्जा निर्माण हाेईल अशा शब्दात अश्लील शिवीगाळ केली. याबाबत पीडीतेने देवगड पाेलिस स्थानकात फिर्याद दाखल केली असून फिर्यादीनुसार देवगड पाेलिसांनी दाेन्ही संशयितांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास महिला पाेलिस हवालदार सविता लाड करीत आहेत.