
राजापूर : गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी महिंद्रा एक्सयूव्ही ३ एक्सओ रेवेक्स कार लांजा तालुक्यातील वेरळ घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रंबलिंग गतिरोधकावरून घसरून दगडावर जोरात आदळली. या अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला असून कारचे मोठे नुकसान झाले. शनिवारी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील पर्यटक गोव्याहून फिरून परतत असताना वेरळ घाटात हा अपघात झाला. मेघा समय गाला (वय २९, रा.ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली पूर्व, मुंबई) या आपल्या ताब्यातील महिंद्रा एक्सयूव्ही ३ एक्सओ रेवेक्स कार (एमएच.४७.सीडी.१४६३) घेऊन अन्य तीन जणांसह मुंबईच्या दिशेने जात होत्या. घाटातील वळणावर वेगात गाडी वळवताना चालकाला कार नियंत्रित करता आली नाही. त्यामुळे कार रबलिंग गतिरोधकावरून घसरून दगडावर जोरात आदळली.
अपघात झाला तेव्हा कारमध्ये मेघा गाला यांच्यासह पती समय गाला (वय ३३, रा.कांदिवली पूर्व, मुंबई), व नातेवाईक श्रुती फुरिया (वय ३६) आणि शिखर शहा (वय ३६, दोघेही रा. १०१ मेघदूत, मालाड पश्चिम, मुंबई) हे प्रवास करत होते. या अपघातात समय गाला यांच्या चेहऱ्याला किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी लांजा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून याबाबत अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








