LIVE UPDATES

Nitesh Rane : पालकमंत्री नितेश राणेंची सावंतवाडीत एसपींसह बैठक

अवैध धंद्यांविरोधात 'ॲक्शन प्लॅन' : रेस्ट हाऊसवर तब्बल ४० मिनिटे बैठक
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 21, 2026 05:40 PM
views 167  views
Nitesh Rane meets Sindhudurg Superintendent of Police Mohan Dahikar in Sawantwadi

सावंतवाडी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यासोबत विशेष बैठक घेतली. सावंतवाडीच्या शासकीय विश्रामगृहात त्यांनी तब्बल ४० मिनिटे चर्चा केली. या बैठकीत मटका, जुगारसह अवैध धंद्याचा बिमोड करण्याबाबत 'ॲक्शन प्लॅन' तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

पालकमंत्री नितेश राणे आज सावंतवाडी येथे आले होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यासोबत त्यांनी विशेष बैठक घेतली. सावंतवाडीच्या शासकीय विश्रामगृहात तब्बल ४० मिनिटे त्यांच्यात चर्चा झाली. यावेळी मटका, जुगारसह अवैध धंद्याबाबत त्यांच्यात चर्चा झाली.

पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा अवैध धंदे मुक्त करण्यासाठीची कडक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे पोलिसांकडून धडक कारवाई देखील केली जात आहे. याच अनुषंगाने सावंतवाडी तालुक्यातील आढावा देखील पालकमंत्री श्री. राणे यांनी घेतला.

पोलिस अधीक्षकांना त्यांनी काही सुचना देखील केल्यात. या बैठकीत अवैध धंदे मुळासकट उखडून टाकण्यासाठी 'ॲक्शन प्लॅन' तयार करण्यात आल्याची माहिती देखील सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. यामुळे अवैध धंदेवाईकांचे धाबे मात्र चांगलेच दणाणून गेले आहेत.