
सिंधुदुर्ग : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर यांची सलग चौथ्यांदा निवड झालेली आहे. ॲड. पार्सेकर यांनी गेल्या तीन टर्ममध्ये ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य म्हणून अतिशय प्रभावी काम केलेले असून वीजवितरण, भारत संचार नगम लि. राज्य परिवहन महामंडळ, आरोग्य विभाग, पुरवठा विभाग,अन्न व औषध प्रशासन विभाग अशा विविध विभागातील ग्राहकांच्या दैनंदिन समस्या सोडवलेल्या आहेत.
गेली अनेक वर्ष ते ग्राहकांमध्ये त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत जनजागृती करत आहेत. ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणूकीबाबतही ते नेहमी आवाज उठवत असतात. सर्व खातेप्रमुखांशी सुसंवाद साधून समस्या दुर करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
ताजी बातमी
View all









