LIVE UPDATES

... जेव्हा पालकमंत्री आपला ताफा थांबवायला सांगता

रिव्हर्स मायग्रेशनच 'अद्वैत' उत्तम उदाहरण : मंत्री नितेश राणे
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 21, 2026 06:19 PM
views 149  views
Nitesh Rane visits Advait Bake House in Sawantwadi and praises entrepreneur Advait Nevgi

सावंतवाडी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व‌ बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा ताफा आज सावंतवाडीत अचानक थांबला. येथील अद्वैत बेक हाऊसला त्यांनी सदिच्छा भेट देत तेथील पदार्थांचा आस्वाद देखील घेतला. यावेळी अद्वैत नेवगी हे रिव्हर्स मायग्रेशनचं अतिशय उत्तम उदाहरण आहे अशा शब्दांत मंत्री श्री. राणे यांनी कौतुक केले. 

मंत्री नितेश राणे यांनी आज सावंतवाडीच्या अद्वैत बेक हाऊसला सदिच्छा भेट दिली. यावेळी आईस्क्रीम, केकसह विविध पदार्थांची चव देखील त्यांनी चाखली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, सावंतवाडीचे युवराज लखमराजे भोंसले, वल्लभ नेवगी, वैभवी नेवगी, अद्वैत नेवगी, सुधीर आडीवरेकर, दिलीप भालेकर, दिपाली भालेकर आदी उपस्थित होते. 

स्थानिक युवकान निर्माण केलेला ब्रॅण्ड कौतुकास्पद असल्याचे उद्गार त्यांनी काढले. यावेळी अद्वैतचे वडील वल्लभ नेवगी यांनी पालकमंत्र्यांच्या सरप्राईज व्हिजीटबाबत आभार व्यक्त करत माजी मुख्यमंत्री, खास. नारायण राणे यांच्या सोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांना उजाळा दिला. यावेळी मंत्री नितेश राणेंकडून आता पुढची पिढी देखील हे संबंध कायम ठेवत असल्याचे उद्गार काढले. 

यावेळी मंत्री नितेश राणे म्हणाले, अद्वैत हा रिव्हर्स मायग्रेशनचं अतिशय उत्तम उदाहरण आहे. आम्ही जे वारंवार म्हणतो जिल्ह्यातल्या तरुणांनी आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन जिल्ह्याच्या अर्थकारणाला प्रोत्साहन दिलं पाहिजे, जिल्ह्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन दिलं पाहिजे. इथली खाद्यसंस्कृती, भाषा या सगळ्याला प्रोत्साहन देण्याच काम आपल्या युवकांनी असंच केल पाहिजे. याच उत्तम उदाहरण अद्वैत आहे.

मी सोशल मीडियावर त्याच कौतुक ऐकल होत‌, मोठमोठ्या लोकांना त्याच्याबद्दल बोलताना ऐकलं. आज स्वतः इथे आल्यानंतर विविध पदार्थ खाल्ल्यानंतर आणि चव घेतल्यानंतर मुंबई आणि पुण्याला मागे टाकेल एवढं दर्जेदार उत्पादन तो बनवत आहे. त्याच्या आई-वडिलांचे आशीर्वाद त्याच्याबरोबर आहेत. महाराष्ट्रासह देशातल्या लोकांनी अद्वैत बेकहाऊसला नक्की भेट द्यावी असेही आवाहन श्री. राणेंनी केले.


ताजी बातमी

View all

Nitesh Rane and Deepak Kesarkar at the foundation stone ceremony of Sawantwadi Panchayat Samiti building
Nitesh Rane : पंचायत समिती नूतन इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
November 21, 2026
Nitesh Rane meets Sindhudurg Superintendent of Police Mohan Dahikar in Sawantwadi
Nitesh Rane : पालकमंत्री नितेश राणेंची सावंतवाडीत एसपींसह बैठक
November 21, 2026
सेवानिवृत्त शिक्षक उदय दिनदयाळ यांचे निधन
November 21, 2026
Indian Railways warns passengers against loud phone calls and music inside trains
Indian Railways Rule : रेल्वे प्रवाशांनो सावधान! रेल्वेमध्ये मोठ्या आवाजात फोनवर बोलल्यास दंड अन् शिक्षेची तरतूद
November 21, 2026
संबंधित बातम्या

View all

Nitesh Rane and Deepak Kesarkar at the foundation stone ceremony of Sawantwadi Panchayat Samiti building
Nitesh Rane : पंचायत समिती नूतन इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
November 21, 2026
सेवानिवृत्त शिक्षक उदय दिनदयाळ यांचे निधन
November 21, 2026
Kurli Devi Temple annual Tripurari Pournima festival celebration in Kurlai Vaibhavwadi
Kurli Devi Tripurari Pournima Festival 2026 : कुर्ली गावचा त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव २४ नोव्हेंबरला
November 21, 2026
Khed Zilla Parishad Primary School in Chiplun reopens with 23 students
Chiplun News : बिल्डरच्या ताब्यात जाणारी खेंडची जिल्हा परिषद शाळा पुन्हा सुरू
November 21, 2026