LIVE UPDATES

Sawantwadi Crime News : सावंतवाडी पोलीस ठाण्यात दारूच्या नशेत पोलिसांशी हुज्जत

पोलिसांना धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 20, 2026 08:25 PM
views 303  views

सावंतवाडी : चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यातच शासकीय कामात अडथळा निर्माण करून पोलिसांना धमकी दिल्याप्रकरणी तसेच गैरवर्तन केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास सावंतवाडी पोलिस ठाणे येथे घडली.

या प्रकरणी संशयित अतिक सामंत, तेजस वंजारी आणि महेश बांदेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही संशयित आरोपींना चौकशीसाठी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी शासकीय कामकाज सुरू असताना त्यात अडथळा आणला. मोठमोठ्याने आरडाओरड करत पोलिसांच्या अंगावर धावून जाऊन धमकी दिली, तसेच दारूच्या नशेत गैरवर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार शिंगाडे करीत आहेत.