LIVE UPDATES

कोकिसरे रेल्वे फाटकाजवळ विनापरवाना सिलिका वाहतूक करणारा डंपर पकडला

४ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त; चालकाविरोधात गुन्हा दाखल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 28, 2026 07:58 PM
views 279  views
vaibhavwadi-illegal-silica-sand-dumper-seized.jpg

वैभववाडी : तालुक्यातील कोकिसरे रेल्वे फाटक परिसरात विनापरवाना सिलिका वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरवर पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई केली. शुक्रवारी (ता. २७) रात्री नऊच्या सुमारास झालेल्या या कारवाईत डंपरसह सुमारे तीन ब्रास सिलिका वाळू असा एकूण ४ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार जिल्ह्यात ऑल आऊट ऑपरेशन सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत पोलीस निरीक्षक दत्ता भोसले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तळेरे-वैभववाडी मार्गावर गस्त घालत होते. यावेळी कोकिसरे रेल्वे फाटकाजवळ वाहनांची तपासणी सुरू असताना तळेरेच्या दिशेने येणारा डंपर (केए २६ बी ४४८६) पोलिसांनी अडविला.

डंपरचालक संजीवकुमार इराप्पा तेलंग (वय ५०, रा. टोप, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याच्याकडे चौकशी केली असता डंपरमध्ये सिलिका असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी तपासणी केली असता सुमारे तीन ब्रास सिलिका वाळू आढळून आली. मात्र, या वाळूच्या वाहतुकीसाठी आवश्यक परवाना चालकाकडे नव्हता. त्यानंतर विशेष पथकाने वैभववाडी पोलिसांना माहिती दिली.

स्थानिक पोलीस आणि तलाठी केदारी बाळासाहेब बागल यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. विनापरवाना वाळू वाहतूक आणि वाळू चोरीप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा डंपर आणि १२ हजार रुपये किमतीची सिलिका वाळू जप्त करण्यात आली.

पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रकांत माने पुढील तपास करीत आहेत.


ताजी बातमी

View all

chiplun-indian-pangolin-rescue-khersheth.jpg
Chiplun Pangolin Rescue : खेरशेतमध्ये दुर्मिळ खवले मांजराच्या पिल्लाला जीवदान
November 28, 2026
Mumbai-Goa Highway Accident : कोंडमळा येथे उभ्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक
November 28, 2026
Karivade Maruti Temple built on a giant rock beside a river in Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra.
Karivade Maruti Temple : नदीच्या पात्रात अजस्त्र खडकावर उभं मारुती मंदिर
November 28, 2026
vedant-pophale-modern-pentathlon-state-level-selection.jpg
Vedant Pophale Modern Pentathlon : वराडकर हायस्कूलचा वेदांत पोफळे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र
November 28, 2026
संबंधित बातम्या

View all

Sawantwadi ATM fraud case involving a stuck ATM card and unauthorized bank withdrawals.
Sawantwadi ATM Fraud : कार्ड एटीएममध्ये अडकवत महिलेची फसवणूक
November 28, 2026
मानसिकदृष्ट्या विकलांग युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार
November 28, 2026
satarda-checkpost-goa-liquor-seizure-sawantwadi-police.jpg
Goa Liquor Seized : सातार्डा चेकपोस्टवर गोवा बनावटीची दारू जप्त
November 28, 2026
Ashok Leyland truck involved in a rash driving case registered by Sawantwadi Police at Amboli Police Checkpost in Sindhudurg.
Amboli Rash Driving Case : बांदा-संकेश्वर महामार्गावर बेदरकार ट्रक चालवणे पडले महागात
November 28, 2026