LIVE UPDATES

Amboli Rash Driving Case : बांदा-संकेश्वर महामार्गावर बेदरकार ट्रक चालवणे पडले महागात

आंबोली चेकपोस्टवर पोलिसांची कारवाई : सावंतवाडी पोलिसांत चालकावर गुन्हा दाखल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 28, 2026 04:40 PM
views 19  views
Ashok Leyland truck involved in a rash driving case registered by Sawantwadi Police at Amboli Police Checkpost in Sindhudurg.

सावंतवाडी : बांदा ते संकेश्वर महामार्गावरील आंबोली पोलीस चेकपोस्ट येथे हयगयीने आणि बेदरकारपणे भरधाव वेगाने वाहन चालवल्याप्रकरणी एका ट्रक चालकाविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यल्लाप्पा मारुती बागडी (वय ४६, रा. दड्डी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री आरोपी यल्लाप्पा बागडी हा आपल्या ताब्यातील अशोक लेलँड कंपनीची गाडी (क्र. KA-23-B-8117) बांदा ते संकेश्वर जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावरून घेऊन जात होता. आंबोली पोलीस चेकपोस्ट येथे तो अत्यंत बेदरकारपणे, हयगयीने आणि इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा भरधाव वेगाने वाहन चालवताना कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आला.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गौरव गोविंद परब यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक यल्लाप्पा बागडी याच्याविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव करत आहेत.


ताजी बातमी

View all

satarda-checkpost-goa-liquor-seizure-sawantwadi-police.jpg
Goa Liquor Seized : सातार्डा चेकपोस्टवर गोवा बनावटीची दारू जप्त
November 28, 2026
सावंतवाडीत गोवा बनावटीच्या दारूवर पोलिसांची कारवाई
November 28, 2026
Sindhudurg District Collector Trupti Dhodmise inspects proposed earthen check dam sites on the Terekhol River to address summer water scarcity.
Sindhudurg Water Shortage : पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार दुष्काळात पाणीपुरवठ्यासाठी नद्यांवर होणार मातीचे बंधारे
November 28, 2026
एकपात्री अभिनय स्पर्धेचे सुदन कवठणकर यांच्याहस्ते थाटात उद्घाटन
November 28, 2026
संबंधित बातम्या

View all

satarda-checkpost-goa-liquor-seizure-sawantwadi-police.jpg
Goa Liquor Seized : सातार्डा चेकपोस्टवर गोवा बनावटीची दारू जप्त
November 28, 2026
सावंतवाडीत गोवा बनावटीच्या दारूवर पोलिसांची कारवाई
November 28, 2026
Savarde Police register an assault case after a 47-year-old farmer is allegedly attacked with a wooden stick at Kutre Stop in Chiplun.
कुटरे नाक्यावरील पिकअप शेडमध्ये वादातून एकाला लाकडी दांडक्याने मारहाण
November 28, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Kudal car Accident : ओव्हरटेक करताना चालकाचा ताबा सुटला
November 27, 2026