LIVE UPDATES

Goa Liquor Seized : सातार्डा चेकपोस्टवर गोवा बनावटीची दारू जप्त

वृद्धाविरुद्ध सावंतवाडी पोलिसांची कारवाई : २० दारू बाटल्या जप्त
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 28, 2026 04:49 PM
views 18  views
satarda-checkpost-goa-liquor-seizure-sawantwadi-police.jpg

सावंतवाडी : तालुक्यातील सातार्डा चेकपोस्ट येथे अवैधपणे गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी एका वृद्धावर कारवाई केली आहे. या कारवाईत २ हजार रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. 

फिलिस डिसोजा असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी सातार्डा चेकपोस्ट येथे पोलीस पथक कर्तव्यावर असताना संशयित फिलिस डिसोजा हा एका पिशवीतून गोवा बनावटीची दारू घेऊन जाताना आढळून आला.

पोलिसांनी त्याची झडती घेतली असता पिशवीत 'गोल्डन एसी ब्ल्यूफाईन व्हिस्की' लेबल असलेल्या १८० मिली मापाच्या प्लास्टिकच्या २० सीलबंद बाटल्या मिळून आल्या. ही दारू त्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कोणताही परवाना नसताना अवैधपणे आपल्या ताब्यात बाळगली होती.

याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत सातार्डा दूरक्षेत्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश वासू गवस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करत नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टाकेकर करत आहेत.


ताजी बातमी

View all

Ashok Leyland truck involved in a rash driving case registered by Sawantwadi Police at Amboli Police Checkpost in Sindhudurg.
Amboli Rash Driving Case : बांदा-संकेश्वर महामार्गावर बेदरकार ट्रक चालवणे पडले महागात
November 28, 2026
सावंतवाडीत गोवा बनावटीच्या दारूवर पोलिसांची कारवाई
November 28, 2026
Sindhudurg District Collector Trupti Dhodmise inspects proposed earthen check dam sites on the Terekhol River to address summer water scarcity.
Sindhudurg Water Shortage : पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार दुष्काळात पाणीपुरवठ्यासाठी नद्यांवर होणार मातीचे बंधारे
November 28, 2026
एकपात्री अभिनय स्पर्धेचे सुदन कवठणकर यांच्याहस्ते थाटात उद्घाटन
November 28, 2026
संबंधित बातम्या

View all

Ashok Leyland truck involved in a rash driving case registered by Sawantwadi Police at Amboli Police Checkpost in Sindhudurg.
Amboli Rash Driving Case : बांदा-संकेश्वर महामार्गावर बेदरकार ट्रक चालवणे पडले महागात
November 28, 2026
सावंतवाडीत गोवा बनावटीच्या दारूवर पोलिसांची कारवाई
November 28, 2026
Savarde Police register an assault case after a 47-year-old farmer is allegedly attacked with a wooden stick at Kutre Stop in Chiplun.
कुटरे नाक्यावरील पिकअप शेडमध्ये वादातून एकाला लाकडी दांडक्याने मारहाण
November 28, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Kudal car Accident : ओव्हरटेक करताना चालकाचा ताबा सुटला
November 27, 2026