LIVE UPDATES

Sawantwadi ATM Fraud : कार्ड एटीएममध्ये अडकवत महिलेची फसवणूक

राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएममधील प्रकार : अज्ञातान काढले खात्यातील पैसे, चोरटा पोलिसांच्या रडारवर
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 28, 2026 07:47 PM
views 407  views
Sawantwadi ATM fraud case involving a stuck ATM card and unauthorized bank withdrawals.

सावंतवाडी : शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेत पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेलेल्या महिलेचे कार्ड मशिनमध्ये अडकले होते. यावेळी एका अनोळखी व्यक्तीकडून मदतीचा बहाणा केल्याचे तिचे म्हणणे आहे. तर कार्ड निघत नसल्याने मशिनवर चिकटवलेल्या नंबरवर फोन केला असता संबंधिताकडून दिशाभूल करत कालांतराने खात्यातून पैसे काढल्याची घटना समोर आहे. महिलेच्या तक्रारीवरून बँकेतून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत पोलिसांकडून तपास कामास सुरुवात करण्यात आली आहे. 

एका राष्ट्रीयकृत बँकेत संबंधित महिला पैसे काढण्यासाठी गेली होती. पैसे काढल्यानंतर एटीएम कार्ड मशिनमध्येच अडकल्याचे तिच्या निदर्शनास आले. यावेळी शेजारी उभ्या असलेल्या एका अज्ञात व्यक्तीकडून मदतीचा बहाणा करत कार्ड काढण्यासाठी प्रयत्न केल्याची तक्रार नोंदवली आहे.

तर याचवेळी मशिनवरील कागदावर लिहीलेला नंबर बघून संपर्क केला असता समोरील व्यक्तीकडून एंटर अन् कॅन्सल बटण दाबून कोड टाकल्यास कार्ड निघेल असे सांगितले. मात्र, तरीही कार्ड न निघाल्याने महिलेन विचारणा केली असता मशिनमध्ये असे प्रोब्लेम येत असतात. तुमचे पैसे जाणार नाहीत, उद्या इंजिनिअर येऊन कार्ड काढून देईल असे महिलेला सांगितले गेले. हा प्रकार तेथील सिक्युरिटी गार्डच्या कानावर घालून ती महिला आपल्या घरी परतली. 

दरम्यान, घरी गेल्यानंतर खात्यातील रक्कम चेक केली असता फक्त 46 रूपये खात्यात असल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बँकेत जाऊन तिने बँक स्टेटमेंट तपासले असता खात्यातून तीन वेळा रक्कम काढली गेल्याचे निदर्शनास आले. मात्र, हे व्यवहार आपण केलेले नसून संबंधित अज्ञात व्यक्ती व फोनवरील व्यक्तीकडून झाल्याचा संशय व्यक्त करत महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

तसेच एटीएममधील आपल कार्ड काढून घेत नंतर दुसरं कार्ड तिथे अडवले गेल्याचेही महिलेचे म्हणणे असून तिने तशी तक्रार बँकेसह पोलिसांत केली आहे. संबंधित अज्ञात व्यक्तीसह मोबाईलवरून फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासह खात्यातून काढलेली रक्कम परत मिळावी अशी मागणी तिच्याकडून पोलिसांकडे करण्यात आली आहे. 

या प्रकरणाची दखल घेत सावंतवाडी पोलिसांकडून तपासाला वेग दिला आहे. संबंधित बँकेकडून एटीएम मधील सीसीटीव्ही फुटेज मागून घेत त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे. राष्ट्रीयकृत बँकेंच्या शेजारील एटीएममध्ये हा प्रकार घडल्याने फसवणूक करणाऱ्या चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी कार्यरत असल्याची माहिती पोलिसांकडून दिली गेली. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रमोद पाटील  करत आहेत. त्यामुळे एटीएममधून फसवणूक करणाऱ्या या चोरांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे.


ताजी बातमी

View all

chiplun-indian-pangolin-rescue-khersheth.jpg
Chiplun Pangolin Rescue : खेरशेतमध्ये दुर्मिळ खवले मांजराच्या पिल्लाला जीवदान
November 28, 2026
Mumbai-Goa Highway Accident : कोंडमळा येथे उभ्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक
November 28, 2026
Karivade Maruti Temple built on a giant rock beside a river in Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra.
Karivade Maruti Temple : नदीच्या पात्रात अजस्त्र खडकावर उभं मारुती मंदिर
November 28, 2026
vedant-pophale-modern-pentathlon-state-level-selection.jpg
Vedant Pophale Modern Pentathlon : वराडकर हायस्कूलचा वेदांत पोफळे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र
November 28, 2026
संबंधित बातम्या

View all

vaibhavwadi-illegal-silica-sand-dumper-seized.jpg
कोकिसरे रेल्वे फाटकाजवळ विनापरवाना सिलिका वाहतूक करणारा डंपर पकडला
November 28, 2026
मानसिकदृष्ट्या विकलांग युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार
November 28, 2026
satarda-checkpost-goa-liquor-seizure-sawantwadi-police.jpg
Goa Liquor Seized : सातार्डा चेकपोस्टवर गोवा बनावटीची दारू जप्त
November 28, 2026
Ashok Leyland truck involved in a rash driving case registered by Sawantwadi Police at Amboli Police Checkpost in Sindhudurg.
Amboli Rash Driving Case : बांदा-संकेश्वर महामार्गावर बेदरकार ट्रक चालवणे पडले महागात
November 28, 2026