LIVE UPDATES

मानसिकदृष्ट्या विकलांग युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार

कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल : आरोपी पसार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 28, 2026 07:12 PM
views 427  views

कणकवली : मानसिकदृष्ट्या विकलांग असलेल्या वीस वर्षीय युतीवर धमक्या देऊन सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. त्यानुसार संशयित आरोपी शैलेश शशिकांत मेस्त्री (२८, वरवडे - सुतारवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयित आरोपी शैलेश पसार झाला असल्याची माहिती तपासी अंमलदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी दिली.

याबाबत पीडित युवतीच्या आईने फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, फिर्यादी महिला गोवा राज्यात राहायला असते. तिची मुलगी कणकवली तालुक्यातीलच आपल्या गावात काही कुटुंबीयांसह राहते. काही दिवसांपूर्वी पीडित मुलगी आपल्या आईकडे राहायला आली होती. सदर मुलीच्या पोटात दुखत होते, याबाबत तिच्या आईने विश्वासात घेऊन विचारणा केली असता लैंगिक अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला. 

संशयित आरोपी शैलेश याने युवतीवर नोव्हेंबर २०२५ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत सातत्याने लैंगिक अत्याचार केले. याबाबत कोणालाही काहीही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली, अशी माहिती पीडित मुलीने आपल्या आईला दिली. त्यानुसार आईने आपल्या मुलीसह कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. दरम्यान, पीडित मुलगी गर्भवती नसल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती देखील कणकवली पोलिसांनी दिली.


ताजी बातमी

View all

chiplun-indian-pangolin-rescue-khersheth.jpg
Chiplun Pangolin Rescue : खेरशेतमध्ये दुर्मिळ खवले मांजराच्या पिल्लाला जीवदान
November 28, 2026
Mumbai-Goa Highway Accident : कोंडमळा येथे उभ्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक
November 28, 2026
Karivade Maruti Temple built on a giant rock beside a river in Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra.
Karivade Maruti Temple : नदीच्या पात्रात अजस्त्र खडकावर उभं मारुती मंदिर
November 28, 2026
vedant-pophale-modern-pentathlon-state-level-selection.jpg
Vedant Pophale Modern Pentathlon : वराडकर हायस्कूलचा वेदांत पोफळे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र
November 28, 2026
संबंधित बातम्या

View all

vaibhavwadi-illegal-silica-sand-dumper-seized.jpg
कोकिसरे रेल्वे फाटकाजवळ विनापरवाना सिलिका वाहतूक करणारा डंपर पकडला
November 28, 2026
Sawantwadi ATM fraud case involving a stuck ATM card and unauthorized bank withdrawals.
Sawantwadi ATM Fraud : कार्ड एटीएममध्ये अडकवत महिलेची फसवणूक
November 28, 2026
satarda-checkpost-goa-liquor-seizure-sawantwadi-police.jpg
Goa Liquor Seized : सातार्डा चेकपोस्टवर गोवा बनावटीची दारू जप्त
November 28, 2026
Ashok Leyland truck involved in a rash driving case registered by Sawantwadi Police at Amboli Police Checkpost in Sindhudurg.
Amboli Rash Driving Case : बांदा-संकेश्वर महामार्गावर बेदरकार ट्रक चालवणे पडले महागात
November 28, 2026