LIVE UPDATES

Accident news | पणजीतील मांडवी पूलावर काळाचा घाला

दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 26, 2026 10:52 AM
views 837  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#goa news

पणजी : गोव्यातील मांडवी पुलावर सोमवारी दि. २६ ऑक्टोबर रोजी पहाटे झालेल्या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात नोंदणी असलेल्या दुचाकीची टॅक्सीला जोरदार धडक बसल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात कुशाग्र पटाळे (वय २१, मुंबई) आणि यश मालिक सिंग (वय २०, हरियाणा) यांचा मृत्यू झाला. दोघेही सांकवाळ येथील कायदा महाविद्यालयात शिक्षण घेत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कुशाग्र पटाळे आणि यश मालिक सिंग हे दोघे दुचाकीवरून मांडवी पुलावरून प्रवास करत होते. पहाटे सुमारे ३ ते ३.१५ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या दुचाकीची टॅक्सीला धडक बसली. धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

या अपघातात टॅक्सीचालकासह वाहनातील काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. जखमींना पुढील उपचारांसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (जीएमसी) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून, अपघात नेमका कशामुळे झाला, याचा पुढील तपास पोरवोरिम पोलीस करत आहेत.


ताजी बातमी

View all

महेश इंगळे यांच्या कार्याचा गौरव
October 26, 2026
भारत-न्यूझीलंड टी-२० मालिका जिंकण्याच्या इराद्याने भारतीय संघ उतरणार मैदानात, कधी अन् कुठे रंगणार सामना? वाचा सविस्तर
October 26, 2026
४५ महसूल लोक अदालतींमधून ५३ प्रकरणांचा यशस्वी निपटारा
October 26, 2026
Upcoming OTT movies and web series releases on Netflix and JioHotstar this week
वीकेंडला काय पाहायचं? Netflix आणि JioHotstar वर रिलीज होणार नवीन चित्रपट अन् वेब सीरिज
October 26, 2026
संबंधित बातम्या

View all

सातार्ड्यात मायलेकाने एकमेकांचे हात बांधून तेरेखोल नदीत संपविले जीवन
October 25, 2026
देवगडमध्ये अवैध पर्ससीन मासेमारीवर मत्स्य विभागाची कारवाई
October 25, 2026
मुंबई-गोवा महामार्गावर चालत्या डंपरला भीषण आग
October 25, 2026
Kudal Talathi Bribe Case : पिंगुळीचे तलाठी जितेंद्र खेताडे यांना जामीन मंजूर
October 24, 2026