LIVE UPDATES

मुंबई-गोवा महामार्गावर चालत्या डंपरला भीषण आग

सुदैवाने चालक बालंबाल बचावला : डंपरचा जॉईंट तुटून डिझेल टाकी फुटल्याने पेट घेतला
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 25, 2026 07:33 PM
views 31  views

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर बिबवणे येथे रविवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास एका चालत्या डंपरला अचानक भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. या दुर्घटनेत डंपर (क्रमांक MH07C6198) पूर्णतः जळून खाक झाला आहे. मात्र, चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठी दुर्घटना टळली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सदर डंपर चिरे वाहतुकीसाठी कसालच्या दिशेने जात होता. चालक वासुदेव भगवान तळवणेकर (रा. मळेवाड, सावंतवाडी) यांनी झाराप येथील पेट्रोल पंपावर इंधन भरल्यानंतर गाडी कसालच्या दिशेने पुढे मारली. बिबवणे येथे पोहोचताच अचानक डंपरचा जॉइंट तुटला. या तांत्रिक बिघाडानंतर गाडीने लगेचच पेट घेतला. चालकाने अत्यंत प्रसंगावधान राखून गाडीवर नियंत्रण मिळवत स्वतःचा जीव वाचवला.

काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच कुडाळ नगरपंचायत व कुडाळ एम.आय.डी.सी. अग्निशामक दलाचे बंब तसेच कुडाळ पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले; मात्र तोपर्यंत डंपर पूर्णपणे जळून खाक झाला होता. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर काही काळ वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.


ताजी बातमी

View all

भाजयुमोतर्फे सावंतवाडीत भव्य बॉडी बिल्डिंग, नरकासुर स्पर्धा
October 25, 2026
कुणकेश्वर हायस्कूलच्या सार्थक घाडीची ज्युदो स्पर्धेत चमकदार कामगिरी
October 25, 2026
देवगडमध्ये अवैध पर्ससीन मासेमारीवर मत्स्य विभागाची कारवाई
October 25, 2026
सिंधुदुर्ग विश्वासार्हतेचा 'हाय क्रेडिट स्कोअर'
October 25, 2026
संबंधित बातम्या

View all

देवगडमध्ये अवैध पर्ससीन मासेमारीवर मत्स्य विभागाची कारवाई
October 25, 2026
Kudal Talathi Bribe Case : पिंगुळीचे तलाठी जितेंद्र खेताडे यांना जामीन मंजूर
October 24, 2026
Tiger Shroff Car Firing Case : टायगर श्रॉफच्या कारवरील गोळीबार प्रकरणाला नवे वळण
October 24, 2026
Ratnagiri Murder Case : वर्ष उलटूनही रायपाटण येथील वृद्ध महिलेच्या हत्येचे गूढ कायम
October 24, 2026