LIVE UPDATES

Tarun Tejpal Case : तरुण तेजपालची शिक्षा स्थगितीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

जन्मठेपेसाठी गोवा सरकारचा आग्रह
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 06, 2026 06:38 PM
views 94  views
Former Tehelka editor Tarun Tejpal in connection with the Goa sexual assault case.

नवी दिल्ली : महिला पत्रकारावरील लैंगिक अत्याचार प्रकरणात 'तहलका'चे तत्कालीन संपादक तरुण तेजपाल यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने शिक्षा सुनावली होती. शिक्षा स्थगित करण्यास सर्वोच न्यायालयाने नकार देत तेजपालची याचिका फेटाळून लावली. गोवा राज्याच्या सरकारने उच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आह. याचिकेत त्यांना जन्मठेपेची शिक्षा मिळावी, अशी मागणी केली आहे.

शुक्रवारी झालेली सुनावणी न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. गोवा सरकारने निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे. दिलेली शिक्षा गुन्ह्याचे गांभीर्य विचारात घेता अत्यंत अपुरी आणि सौम्य आहे असा दावा करीत आरोपीला कायद्यातील तरतुदींनुसार जास्तीत जास्त म्हणजेच जन्मठेपेची कमाल शिक्षा देण्यात यावी अशी आग्रही भूमिका राज्य सरकारने केली आहे.

२०१३ मध्ये गोव्यातील एका कार्यक्रमादरम्यान तेजपाल यांच्यावर एका कनिष्ठ महिला सहकाऱ्याचे लैंगिक शोषण आणि बलात्कार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. गोव्यातील एका कनिष्ठ न्यायालयाने २०२१ मध्ये त्यांना या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले होते. त्यानंतर, गोवा सरकारने या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. ६ ऑगस्ट २०२१ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द करीत तेजपाल यांना दोषी ठरवले आणि त्यांना १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.