
सावंतवाडी : एसटी बसस्थानक परिसरात बसमध्ये चढत असताना गर्दीचा गैरफायदा घेऊन एका ७६ वर्षीय वृद्धाच्या खिशातील ५ हजार ५०० रुपयांचे पाकीट लांबवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विठ्ठल फटु मर्गज (वय ७६, रा. वेर्ले, मर्गजवाडी, सावंतवाडी) हे आपल्या पत्नीवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून बसने घरी परतत असताना बसमध्ये चढत असताना हा चोरीचा प्रकार घडला. त्यांच्या पॅन्टच्या खिशातील लेदरच्या पाकिटातील ५,५०० रुपये चोरल्याप्रकरणी मिथुन आकाश बोवी (१९) आणि लक्ष्मी आकाश बोवी (३८, दोन्ही रा. गांधीनगर, मंगरूळ, राज्य - कर्नाटक) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सावंतवाडी पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार धुरी हे करत आहेत.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








