LIVE UPDATES

Ghar Ghar Samvidhan : ‘घर घर संविधान’ उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन

२६ नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे वितरण करणार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 18, 2026 07:47 PM
views 57  views
Sindhudurg district administration planning the Ghar Ghar Samvidhan initiative for Constitution Day 2026.

सिंधुदुर्गनगरी : ‘घर घर संविधान’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत भारतीय संविधानाची उद्देशिका पोहोचविण्यासाठी तसेच संविधान दिन साजरा करण्याच्या नियोजनासाठी गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक प्रभारी अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या अध्यक्षतेखाली १७ नोव्हेंबर रोजी संपन्न झाली. 

या बैठकीस सहायक आयुक्त, समाज कल्याण संतोष चिकणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायत प्रशासनाचे मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

संविधान उद्देशिकेचे वितरण करताना रमाई आवास योजना, विशेष घटक योजना, प्रधानमंत्री आवास योजना व मोदी आवास योजनेचे लाभार्थी, दिव्यांग, विधवा, वंचित घटक तसेच अत्याचारपीडित लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले.

ग्रामीण भागात सर्व पंचायत समिती कार्यालयांमार्फत, तर शहरी भागात सर्व नगरपरिषद व नगरपंचायत कार्यालयांमार्फत संविधान उद्देशिकेचे लवकरात लवकर वितरण करण्यात यावे. तसेच वितरणाचा अहवाल सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास सादर करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. २६ नोव्हेंबर रोजी संविधान उद्देशिकेचे वितरण करून संविधान दिन साजरा करण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.

या बैठकीत भारतीय संविधानाची उद्देशिका (प्रस्ताविका) वितरणाचे नियोजन आणि २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


ताजी बातमी

View all

रिक्षाचालकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
November 18, 2026
शायना एनसी यांच्या कृतीचा सिंधुदुर्ग महिला काँग्रेसकडून निषेध
November 18, 2026
समान नागरी कायद्याबाबत २१ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्याची जनसुनावणी
November 18, 2026
नसबंदी केंद्रातील ३१ कुत्रे एकाच ठिकाणी बंदिस्त, अस्वच्छतेवर नागरिकांचा संताप
November 18, 2026
संबंधित बातम्या

View all

शायना एनसी यांच्या कृतीचा सिंधुदुर्ग महिला काँग्रेसकडून निषेध
November 18, 2026
समान नागरी कायद्याबाबत २१ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्याची जनसुनावणी
November 18, 2026
नसबंदी केंद्रातील ३१ कुत्रे एकाच ठिकाणी बंदिस्त, अस्वच्छतेवर नागरिकांचा संताप
November 18, 2026
महिलांनी दुग्ध व्यवसायासह शेतीपूरक उद्योगांत पुढाकार घ्यावा
November 18, 2026