LIVE UPDATES

रिक्षाचालकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 18, 2026 08:59 PM
views 93  views

सावंतवाडी : शहरातील न्यू सबनीसवाडा येथील रहिवासी आणि रिक्षाचालक दिनेश रामचंद्र मांजरेकर (वय ४२) यांनी बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घराच्या बाजूलाच असलेल्या चिकूच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश मांजरेकर हे बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे उठल्यानंतर आपल्या पत्नीला कामानिमित्त बाहेर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते. मात्र, बराच वेळ होऊनही ते घरी न परतल्याने कुटुंबीय व नातेवाईकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घराशेजारील चिकूच्या झाडाला ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.

दिनेश मांजरेकर हे गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील शाळा क्रमांक ४ परिसरात रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, वडील, भाऊ, भावजया आणि पुतणे असा परिवार आहे.

नगरपरिषदेच्या कर वसुली विभागातील कर्मचारी विद्याधर उर्फ बाळा मांजरेकर आणि लॉन्ड्री व्यावसायिक निलेश मांजरेकर यांचे ते भाऊ होत. या घटनेची खबर त्यांचे पुतणे हितेश मांजरेकर यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली असून, त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.


ताजी बातमी

View all

शायना एनसी यांच्या कृतीचा सिंधुदुर्ग महिला काँग्रेसकडून निषेध
November 18, 2026
समान नागरी कायद्याबाबत २१ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्याची जनसुनावणी
November 18, 2026
Sindhudurg district administration planning the Ghar Ghar Samvidhan initiative for Constitution Day 2026.
Ghar Ghar Samvidhan : ‘घर घर संविधान’ उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन
November 18, 2026
नसबंदी केंद्रातील ३१ कुत्रे एकाच ठिकाणी बंदिस्त, अस्वच्छतेवर नागरिकांचा संताप
November 18, 2026
संबंधित बातम्या

View all

Sawantwadi Crime: एसटी बसमध्ये चढताना वृद्धाच्या खिशातील ५,५०० रुपये लंपास
November 18, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Devgad News : देवगड समुद्रात कर्नाटकची हायस्पीड ट्रॉलर नौका जप्त
November 18, 2026
Kankavli Police Arrest Accused in Minor Girl POCSO Sexual Assault Case
Kankavli Crime News : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी अखेर संशयितास अटक
November 17, 2026
Kankavli police investigate an alleged POCSO case involving a minor schoolgirl in Sindhudurg district.
Kankavli POCSO Case : १४ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार?
November 17, 2026