LIVE UPDATES

समान नागरी कायद्याबाबत २१ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्याची जनसुनावणी

नागरिक, विविध संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींनी सूचना व निवेदनांसह सहभागी व्हावे : जिल्हा प्रशासनाचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 18, 2026 08:01 PM
views 47  views

सिंधुदुर्गनगरी : समान नागरी कायद्याबाबत (UCC) नागरिकांच्या सूचना, हरकती आणि मते जाणून घेण्यासाठी कोकण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येणारी सिंधुदुर्ग जिल्ह्याची जनसुनावणी शनिवार २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.३० ते ५.३० या वेळेत होणार आहे. या जनसुनावणीत जिल्ह्यातील नागरिक, विविध संस्था, संघटना आणि संबंधित गटांच्या प्रतिनिधींनी सहभागी होऊन आपले म्हणणे मांडावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

समान नागरी कायद्याबाबत विविध हितसंबंधी गट, संस्था व नागरिकांच्या सूचना, हरकती आणि मते जाणून घेण्यासाठी शासनामार्फत समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये जनसुनावणी आयोजित करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे.

ही जनसुनावणी विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या कार्यालयातील समिती सभागृह, पहिला मजला, कोकण भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई येथून तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथील मायनाक भंडारी सभागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (V.C.) घेण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संबंधित गट, संस्थांचे प्रतिनिधी तसेच प्रत्यक्ष मुंबई येथे उपस्थित राहण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांनी विभागीय आयुक्त, कोकण विभाग कार्यालय, समिती सभागृह, पहिला मजला, कोकण भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई येथे सुनावणीच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान एक तास अगोदर लेखी निवेदनासह उपस्थित राहावे.

ज्या नागरिकांना मुंबई येथे प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नाही, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथील मायनाक भंडारी सभागृहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या सुनावणीसाठी निर्धारित वेळेपूर्वी किमान एक तास अगोदर लेखी निवेदनासह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

केवळ ऑनलाइन पद्धतीने आपले मत किंवा सूचना सादर करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाने https://ucc.maharashtra.gov.in/⁠ हे अधिकृत पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. या पोर्टलवर ३७ मुद्द्यांच्या आधारे नागरिकांना आपली माहिती, मते व सूचना नोंदविता येणार आहेत.

समान नागरी कायद्याबाबत नागरिकांना आपले मत मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी तसेच विविध संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींनी आपल्या सूचना व निवेदनांसह या जनसुनावणीत सहभागी होऊन आपले मत नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.


ताजी बातमी

View all

रिक्षाचालकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
November 18, 2026
शायना एनसी यांच्या कृतीचा सिंधुदुर्ग महिला काँग्रेसकडून निषेध
November 18, 2026
Sindhudurg district administration planning the Ghar Ghar Samvidhan initiative for Constitution Day 2026.
Ghar Ghar Samvidhan : ‘घर घर संविधान’ उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन
November 18, 2026
नसबंदी केंद्रातील ३१ कुत्रे एकाच ठिकाणी बंदिस्त, अस्वच्छतेवर नागरिकांचा संताप
November 18, 2026
संबंधित बातम्या

View all

शायना एनसी यांच्या कृतीचा सिंधुदुर्ग महिला काँग्रेसकडून निषेध
November 18, 2026
Sindhudurg district administration planning the Ghar Ghar Samvidhan initiative for Constitution Day 2026.
Ghar Ghar Samvidhan : ‘घर घर संविधान’ उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन
November 18, 2026
नसबंदी केंद्रातील ३१ कुत्रे एकाच ठिकाणी बंदिस्त, अस्वच्छतेवर नागरिकांचा संताप
November 18, 2026
महिलांनी दुग्ध व्यवसायासह शेतीपूरक उद्योगांत पुढाकार घ्यावा
November 18, 2026