LIVE UPDATES

वेंगुर्ल्यात उद्यापासून आंतरराष्ट्रीय परिसंवाद

देश विदेशातील २५० शास्त्रज्ञ, ५० विद्यार्थी आणि ५० शेतकरी राहणार उपस्थित
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 18, 2026 01:49 PM
views 213  views
International Agricultural Seminar at Regional Fruit Research Centre Vengurla 2026

वेंगुर्ला : प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे १९ ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. इंडियन सोसायटी ऑफ कोस्टल अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च (आयएससीएआर), कॅनिंग टाउन, पश्चिम बंगाल, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, केंद्रीय मृदा लवणता अनुसंधान संस्थान, कर्नाल, दापोली चॅप्टर ऑफ आयएससीएआर आणि इंटरडिसिप्लिनरी सोसायटी फॉर अ‍ॅडव्हान्समेंट ऑफ अ‍ॅग्रीकल्चर सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने हा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड, इंग्लंडचे डायरेक्टर प्रोफेसर अजित जावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिसंवादाचे उद्घाटन १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता होणार आहे.

परिसंवादाचे प्रमुख आयोजक डॉ. टी. डी. लामा, इंडियन सोसायटी ऑफ कोस्टल अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च (आयएससीएआर), कॅनिंग टाउन, पश्चिम बंगाल असून, सोसायटीचे अध्यक्ष डॉ. बुद्धेस्वर माजी आणि स्थानिक आयोजक डॉ. संतोष सावर्डेकर यांच्या उपस्थितीत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या आंतरराष्ट्रीय परिसंवादाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांतील मान्यवर तज्ञ्यांना सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून फोमेंतो उद्योगसमुहाचे चेअरमन उद्योगपती अवधुत तिंबलो यांना उद्योग क्षेत्रावर व्याख्यान देण्यासाठी विशेष आमंत्रण देण्यात आले आहे.

या परिसंवादासाठी देश-विदेशातील २५० शास्त्रज्ञ, ५० विद्यार्थी आणि ५० प्रगतिशील शेतकरी उपस्थित राहणार आहेत. चार दिवस चालणाऱ्या या परिसंवादात शेतीविषयक विविध विषयांवर सांगोपाग चर्चा होणार आहे. परिसंवादातून समोर येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे भविष्यातील कृषी क्षेत्रातील संशोधनाची दिशा ठरविण्यास मदत होणार असल्याचे प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला यांच्याकडून सांगण्यात आले आहे.


ताजी बातमी

View all

रिक्षाचालकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
November 18, 2026
शायना एनसी यांच्या कृतीचा सिंधुदुर्ग महिला काँग्रेसकडून निषेध
November 18, 2026
समान नागरी कायद्याबाबत २१ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्याची जनसुनावणी
November 18, 2026
Sindhudurg district administration planning the Ghar Ghar Samvidhan initiative for Constitution Day 2026.
Ghar Ghar Samvidhan : ‘घर घर संविधान’ उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन
November 18, 2026
संबंधित बातम्या

View all

शायना एनसी यांच्या कृतीचा सिंधुदुर्ग महिला काँग्रेसकडून निषेध
November 18, 2026
समान नागरी कायद्याबाबत २१ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्याची जनसुनावणी
November 18, 2026
Sindhudurg district administration planning the Ghar Ghar Samvidhan initiative for Constitution Day 2026.
Ghar Ghar Samvidhan : ‘घर घर संविधान’ उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन
November 18, 2026
नसबंदी केंद्रातील ३१ कुत्रे एकाच ठिकाणी बंदिस्त, अस्वच्छतेवर नागरिकांचा संताप
November 18, 2026