LIVE UPDATES

Sawantwadi Crime News : सावंतवाडीत शाळकरी अल्पवयीन मुलगा-मुलीला दोन तास ठेवले डांबून

दमदाटी करून पाठलाग : दोन युवकांना अटक
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 12, 2026 07:59 PM
views 576  views

सावंतवाडी : येथील एका निर्जन बागेत बसलेल्या शाळकरी अल्पवयीन मुलगा आणि मुलीला दमदाटी करून तब्बल दोन तास कोंडून ठेवल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दोन युवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

रुपेश परब (वय २७) आणि विनायक कवडेकर (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणांची नावे आहेत. मंगळवारी एक शाळकरी अल्पवयीन मुलगा व मुलगी तालुक्यातील एका निर्जन बागेच्या ठिकाणी गेले होते. यादरम्यान संशयित आरोपींनी त्या मुलांना गाठत दमदाटी केली आणि "तुम्ही रात्रीच्या वेळी येथे का बसलात?" अशी विचारणा करत त्यांना तब्बल दोन तास एका ठिकाणी कोंडून ठेवले.

अखेर कसेबसे संशयितांच्या तावडीतून सुटका करून घेत त्या मुलांनी दुचाकीवरून पळ काढला. मात्र, संशयित तरुणांनी त्यांचा पाठलाग केला. घाबरलेल्या मुलांनी थेट सावंतवाडी पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.

पोलिसांनी तातडीने पावले उचलत दोन्ही मुलांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेत घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर पालकांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात जाऊन त्या दोन संशयित युवकांविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रुपेश परब आणि विनायक कवडेकर यांना अटक केली. त्यांना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.


ताजी बातमी

View all

Uday Samant announces Janajatiya Gaurav Diwas Seva Saptah programmes for tribal communities in Ratnagiri
‘जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह’ तळागाळातील आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवा
November 12, 2026
Devgarh BJP members celebrate Palawarachi Diwali 2026 with the Katkari community at Munge village
मुणगे कातकरी वस्तीवर रंगली पालावरची दिवाळी
November 12, 2026
Villagers cleaning the historic pond near the 14th-century Laxminarayan Temple in Valaval, Kudal
Valaval Laxminarayan Temple : ७०० वर्षांच्या ऐतिहासिक वालावल मंदिर तलावाची दुरवस्था
November 12, 2026
Konkan Railway train number changes effective from January 1, 2027
१ जानेवारी पासून बदलणार कोकण रेल्वेच्या अनेक गाड्यांचे क्रमांक, पाहा यादी
November 12, 2026
संबंधित बातम्या

View all

Naigaon railway station incident where a woman was allegedly pushed from a local train
लोकलमधील छेडछाडीला विरोध केला अन् तरुणीला ट्रेनमधून ढकलले; नायगावच्या घटनेत तरुणीने गमावला हात
November 12, 2026
Rajapur Police seize Goa-made foreign liquor, two-wheeler and mobile phones worth ₹83,020.
Illegal Goa Liquor Seized : गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक
November 11, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Dodamarg News : दोडामार्ग बाजारपेठेत परप्रांतीय तरुणाचा धुमाकूळ
November 11, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Sindhudurg Crime News : रेडीतील जंगलमय भागात आढळला अज्ञाताचा मृतदेह
November 11, 2026