LIVE UPDATES

India vs Pakistan U19 Asia Cup Final 2026 : अंडर-१९ आशिया कप फायनलमध्ये भारत-पाकिस्तान महामुकाबला

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 12, 2026 06:55 PM
views 66  views
India and Pakistan U19 cricket teams to face each other in the Under-19 Asia Cup 2026 final

नवी दिल्ली : 'अंडर-१९ वनडे आशिया कप'मध्ये पाकिस्तानविरुद्ध सूड घेण्याची संधी भारताकडे आहे. गुरुवारी झालेल्या अंडर १९ पुरुष आशिया कप २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताने अफगाणिस्तानचा ८ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. त्यामुळे भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.

पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानने बांगलादेशचा ९ गडी राखून पराभव केला होता. याआधी गट टप्प्यात भारताला पाकिस्तानकडून ३ गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. आता शनिवारी (१४ नोव्हेंबर) ओमानमधील अल अमरात क्रिकेट मैदानावर होणाऱ्या अंतिम सामन्यात भारत या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरू होईल, तर नाणेफेक अर्धा तास आधी होईल.

अंडर १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत ८ बाद २२७ धावा केल्या. २२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, आर्यवीर सेहवाग आणि लक्ष्य यांनी पहिल्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी करत भारतीय संघाला उत्कृष्ट सुरुवात करून दिली. आर्यवीर सेहवागने ५७ चेंडूंत ५१ धावा केल्या. यामध्ये चार चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. कर्णधार लक्ष्य राजेश रायचंदानीने ९० चेंडूंत ९३ धावांची दमदार खेळी केली.


ताजी बातमी

View all

Konkan Railway train number changes effective from January 1, 2027
१ जानेवारी पासून बदलणार कोकण रेल्वेच्या अनेक गाड्यांचे क्रमांक, पाहा यादी
November 12, 2026
Sindhudurg District Central Cooperative Bank Chairman Manish Dalvi distributes loan approval letters to dairy farmers in Banda
Sindhudurg Bank : दुग्धव्यवसायाला आर्थिक बळ देण्यासाठी सिंधुदुर्ग बँक कटिबद्ध
November 12, 2026
गोपुरीत १५ रोजी बाल दिन कार्यक्रम
November 12, 2026
Citizens stage a road blockade at Palaye protesting against the poor condition of Tilari-Vijghar road in Dodamarg
Dodamarg News : तिलारी-विजघर रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात नागरिक आक्रमक
November 12, 2026
संबंधित बातम्या

View all

India U19 cricket team celebrates victory over Afghanistan in U19 Asia Cup 2026 semifinal
India U19 vs Afghanistan U19 : अंडर-१९ आशिया कपच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय
November 12, 2026
India vs New Zealand 4th ODI probable playing XI with Shreyas Iyer, Ishan Kishan and Rohit Sharma
IND vs NZ 4th ODI : चौथ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात मोठे बदल, असा आहे संभाव्य संघ
November 12, 2026
Indian shooter jaypal Malviya wins silver medal at ISSF World Championship in Doha and secures an Olympic quota for India.
जुन्या पिस्तुलाच्या जोरावर जयपाल मालवीय यांनी भारताला मिळवून दिला २०२८ ऑलिम्पिकचा पहिला कोटा
November 11, 2026
India U19 vs Afghanistan U19 and Pakistan U19 vs Bangladesh U19 semifinal matches in U19 Asia Cup 2026.
भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येणार? अंडर-19 आशिया कपच्या फायनलचे समीकरण जाणून घ्या
November 11, 2026