
मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे . मध्य रेल्वेमध्ये तब्बल 2 हजार 861 अप्रेंटिस पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर या विभागांमध्ये ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
त्यामुळे आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना रेल्वेमध्ये प्रशिक्षणाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.यामध्ये मुंबई विभागासाठी 1712 जागा, भुसावळ विभागासाठी 500 जागा, पुणे विभागासाठी 271 जागा, नागपूर विभागासाठी 221 जागा, तर सोलापूर विभागासाठी 157 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.या भरतीसाठी उमेदवारांनी दहावीची परीक्षा किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेडमधील आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये शुल्क आकारण्यात येणार असून, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क माफ असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 डिसेंबर 2026 असून या भरतीसंदर्भातील अधिकृत जाहिरात, पात्रता, ट्रेडनिहाय जागा आणि अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासूनच उमेदवारांनी अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








