LIVE UPDATES

१ जानेवारी पासून बदलणार कोकण रेल्वेच्या अनेक गाड्यांचे क्रमांक, पाहा यादी

आपल्याला हे माहिती आहे का?
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 12, 2026 07:21 PM
views 61  views
Konkan Railway train number changes effective from January 1, 2027

सावंतवाडी : तुम्ही कोकण रेल्वेने प्रवास करता का? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. रेल्वे प्रशासनाने कोकण आणि दक्षिण मध्य रेल्वे मार्गावरील काही महत्त्वाच्या गाड्यांचे जुने क्रमांक आणि त्यांचे वर्गीकरण (प्रवर्ग) बदलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

तिरुवनंतपुरम नॉर्थ एक्स्प्रेस आता सुपरफास्टवरून 'एक्स्प्रेस' श्रेणीत आली असून, हिचा नवीन क्रमांक 11073 आणि 11074 असा असेल. लोकमान्य टिळक टर्मिनस - करमाळी एक्स्प्रेस: हिचा नवीन क्रमांक आता 11053 आणि 11054 असणार आहे. 

एलटीटी - तिरुअनंतपुरम नॉर्थ 'गरीब रथ' एक्स्प्रेस ही गाडी आता एक्स्प्रेस श्रेणीत धावणार असून, हिचा नवीन क्रमांक 16371 आणि 16372 असणार आहे. तसेच, वास्को-द-गामा - हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसचा नवीन क्रमांक 17379 आणि 17380 असा असेल.

दक्षिण मध्य रेल्वेने देखील काचेगुडा - कुंमटा सुपरफास्ट एक्स्प्रेसचा क्रमांक बदलून 17689 आणि 17690 केला आहे. विशेष म्हणजे, या बदलाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2027 पासून देशभरात लागू होत आहे. त्यामुळे, 1 जानेवारी 2027 नंतर या मार्गांवर प्रवास करताना नवीन क्रमांकानेच तिकीट बुक करा, जेणेकरून प्रवासात कोणतीही गैरसोय होणार नाही.


संकलन - स्वप्निल परब

मुख्य उपसंपादक, दै. कोकणसाद