LIVE UPDATES

‘जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह’ तळागाळातील आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवा

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे प्रशासनाला निर्देश : क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 12, 2026 08:30 PM
views 104  views
Uday Samant announces Janajatiya Gaurav Diwas Seva Saptah programmes for tribal communities in Ratnagiri

रत्नागिरी : जल, जंगल आणि जमिनीच्या रक्षणासाठी तसेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेले योगदान अतुलनीय व प्रेरणादायी आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ दरम्यान आयोजित ‘जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताहा’ची माहिती आणि शासकीय योजनांचे लाभ जिल्ह्यातील प्रत्येक आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवावेत, असे स्पष्ट निर्देश राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज दिले.     

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तत्पूर्वी, पालकमंत्री डॉ. सामंत यांनी क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, नगरसेवक राजन शेट्ये, विजय खेडेकर, राजेंद्र महाडीक आदी उपस्थित होते.

लाभ वाटप, सांस्कृतिक दर्शन आणि १५१ वी जयंती सोहळा

केंद्र शासनाच्या ऐतिहासिक निर्णयानुसार १५ नोव्हेंबर हा दिवस देशभरात ‘जनजातीय गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यात आदिवासी विकास प्रकल्प पेण विभागाच्या समन्वयाने आठवडाभर विविध लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.      

या सप्ताहांतर्गत शुक्रवार १३ नोव्हेंबर रोजी ‘लाभ वाटप व आर्थिक सक्षमीकरण दिवस’ साजरा होणार असून, न्यूक्लियस बजेट, ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’, ‘पीएम जनमन’ आणि महिला बचत गटांना थेट धनादेश वाटप व कृषीपूरक व्यवसायासाठी मार्गदर्शन केले जाईल. शनिवार १४ नोव्हेंबर रोजी सर्व तालुक्यांतील आदिवासी स्मारके व पुतळ्यांची स्वच्छता करून सायंकाळी दीपोत्सव व पारंपरिक आदिवासी संस्कृती दर्शन कार्यक्रम होणार आहेत.

तसेच रविवार १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जिल्हा व तालुका स्तरावर स्थानिक आदिवासी महापुरुषांना माल्यार्पण करून अभिवादन केले जाईल, तर गडचिरोली येथे राज्यस्तरीय मुख्य सोहळा व पुरस्कार वितरण संपन्न होणार आहे.

शासकीय सेवा, आरोग्य तपासणी आणि युवक सक्षमीकरण

सेवा सप्ताहाच्या पुढील टप्प्यात सोमवार १६ नोव्हेंबर रोजी आधारकार्ड दुरुस्ती व अद्ययावतीकरण शिबिरासोबतच वनपट्टेधारकांना विविध लाभ वाटप, शेतकरी नोंदणी आणि पीकविमा मार्गदर्शन केले जाईल. मंगळवार १७ नोव्हेंबर रोजी आरोग्य व पोषण जनजागृती शिबिरात रक्तदाब, मधुमेह व सिकलसेल आजाराची मोफत तपासणी, माता-बाल आरोग्य आणि परसबाग व पौष्टिक तृणधान्य वापराबाबत मार्गदर्शन तसेच विद्यापीठ स्तरावर विशेष कार्यक्रम आयोजित केले आहेत.

सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी, बुधवार १८ नोव्हेंबर रोजी आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व जात वैधता प्रमाणपत्र मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा तसेच युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगार समुपदेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करून या सेवा सप्ताहाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा, असे आवाहनही पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी यावेळी केले.


ताजी बातमी

View all

Devgarh BJP members celebrate Palawarachi Diwali 2026 with the Katkari community at Munge village
मुणगे कातकरी वस्तीवर रंगली पालावरची दिवाळी
November 12, 2026
Sawantwadi Crime News : सावंतवाडीत शाळकरी अल्पवयीन मुलगा-मुलीला दोन तास ठेवले डांबून
November 12, 2026
Villagers cleaning the historic pond near the 14th-century Laxminarayan Temple in Valaval, Kudal
Valaval Laxminarayan Temple : ७०० वर्षांच्या ऐतिहासिक वालावल मंदिर तलावाची दुरवस्था
November 12, 2026
Konkan Railway train number changes effective from January 1, 2027
१ जानेवारी पासून बदलणार कोकण रेल्वेच्या अनेक गाड्यांचे क्रमांक, पाहा यादी
November 12, 2026
संबंधित बातम्या

View all

Devgarh BJP members celebrate Palawarachi Diwali 2026 with the Katkari community at Munge village
मुणगे कातकरी वस्तीवर रंगली पालावरची दिवाळी
November 12, 2026
Villagers cleaning the historic pond near the 14th-century Laxminarayan Temple in Valaval, Kudal
Valaval Laxminarayan Temple : ७०० वर्षांच्या ऐतिहासिक वालावल मंदिर तलावाची दुरवस्था
November 12, 2026
Konkan Railway train number changes effective from January 1, 2027
१ जानेवारी पासून बदलणार कोकण रेल्वेच्या अनेक गाड्यांचे क्रमांक, पाहा यादी
November 12, 2026
Sindhudurg District Central Cooperative Bank Chairman Manish Dalvi distributes loan approval letters to dairy farmers in Banda
Sindhudurg Bank : दुग्धव्यवसायाला आर्थिक बळ देण्यासाठी सिंधुदुर्ग बँक कटिबद्ध
November 12, 2026