LIVE UPDATES

Cyber Fraud : फोनपे यूपीआयच्या माध्यमातून व्यापाऱ्याची आर्थिक फसवणूक

बँक खात्यातून परस्पर ९२ हजार रुपये रक्कम लंपास : सायबर फसवणुकीची तक्रार दाखल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 19, 2026 08:54 PM
views 73  views
Cyber fraud incident involving a merchant who allegedly lost Rs 92000 through PhonePe UPI in Achara Sindhudurg

मालवण : ऑनलाइन आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार वाढत असतानाच आचरा येथील एका व्यापाऱ्याला सायबर भामट्यांनी ९२ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. संतोष तुळशीदास सामंत यांच्या बँक खात्यातून त्यांच्या माहितीशिवाय रक्कम वळती करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

आचरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष सामंत यांनी याप्रकरणी सायबर तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमध्ये एकूण ९२ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. बँक खात्यातील रक्कम परस्पर काढून घेण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

तक्रारीतील व्यवहाराच्या तपशिलानुसार, १७ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २.२५ वाजण्याच्या सुमारास फोनपे यूपीआयच्या माध्यमातून बँक ऑफ महाराष्ट्रमधील खात्यातून १२ हजार रुपयांचा व्यवहार झाल्याची नोंद आहे. दरम्यान, २१ हजार ९९९ रुपयांची रक्कम होल्ड करण्यात आल्याचेही म्हटले आहे. 

क्रेडेन्शियल चोरी, बनावट ओळख किंवा ओळख चोरीच्या माध्यमातून ही फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे ऑनलाइन आर्थिक व्यवहारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, बँक खात्याची गोपनीय माहिती, ओटीपी अथवा यूपीआय पिन कोणालाही देऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे.


ताजी बातमी

View all

Nitesh Rane reviews Sindhudurg drought management plan and water scarcity measures at district collector office
Sindhudurg Drought Management Plan : टंचाई आराखड्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करा
November 19, 2026
Nitesh Rane reviews new Marine Engine Fitter and Marine Fitter courses in Sindhudurg ITIs
Marine Courses in Sindhudurg ITI : जहाज बांधणी, बंदर विकासासाठी सिंधुदुर्गात कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू करणार
November 19, 2026
Nitesh Rane hands over appointment letter to Shailesh Newalkar under compassionate appointment scheme in Sindhudurg
अनुकंपा तत्त्वावरील पात्र उमेदवारास पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
November 19, 2026
आकारीपड जमीन प्रश्नावर उद्या गोठोस तिठा येथे महत्त्वपूर्ण मेळावा
November 19, 2026
संबंधित बातम्या

View all

सातार्डा येथे मटका जुगारावर पोलिसांची कारवाई
November 19, 2026
आंबेलीच्या वळणावर एसटी बस-दुचाकीची भीषण धडक
November 19, 2026
Citizens and all-party leaders submit a memorandum to Kudal Police demanding a thorough investigation into recent crimes.
Kudal Crime News : कुडाळमधील स्टेट बँक दरोडा व चैन स्नॅचिंग प्रकरणांची सखोल चौकशी करा
November 19, 2026
रिक्षाचालकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
November 18, 2026