
रांची : झारखंडच्या गुमला जिल्ह्यात एका १३ वर्षीय मुलीचे काही अज्ञात तरुणांकडून अपहरण करुन सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. तिला निर्दयपणे मारहाण केल्याने ती गंभीर जखमी झाली होती. प्रकृती गंभीर असल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले मात्र, तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, १३ वर्षीय पीडित मुलगी २४ सप्टेंबरच्या संध्याकाळी घरातून बाहेर पडली होती. यावेळी काही अज्ञात तरुणांकडून तिचे अपहरण करण्यात आले. या तरुणांकडून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर पिडित मुलगी तिच्या घराबाहेर अत्यवस्थ आणि अर्धवट शुद्धीवर असलेल्या अवस्थेत सापडली.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पालकोट पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, गुरुवारी रात्री त्यांची मुलगी घराबाहेर गंभीर अवस्थेत सापडली. तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिला निर्दयपणे मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तिला उपचारासाठी सुरुवातीला कोलेबिरा आणि सिमडेगा येथे नेण्यात आले होते, परंतु तेथील डॉक्टरांनी तिला गुमला येथे हलवण्यास सांगितले.
त्यानंतर, गुमला सदर रुग्णालयातील डॉक्टरांनीही तिची चिंताजनक प्रकृती पाहता तिला रांची येथील रुग्णालयात हलवले. तिथे तिच्यावर उपचार सुरू होते, परंतु शनिवारी तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तीव्र केला आहे. पोलिसांनी चौकशीसाठी मुलीचे काही मित्र आणि काही तरुणांना ताब्यात घेतले आहे. गुमलाचे पोलीस अधीक्षक हरीश बिन झमान यांनी रुग्णालय प्रशासनाला पत्र लिहून मृत मुलीचे शवविच्छेदन वैद्यकीय समितीमार्फत करण्याची विनंती केली आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आणि तपासादरम्यान समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे पोलीस पुढील कारवाई करतील. पोलिसांनी अद्याप कोणत्याही आरोपीच्या अटकेला दुजोरा दिलेला नाही.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










