
बांदा : भारतीय डाक विभाग आयोजित ग्रामीण सेवकांच्या संमेलनात झोळंबे गावात कार्यरत असलेले कार्तिक जारवाल यांचा सन्मान करण्यात आला. त्यानी गेल्या आर्थिक वर्षात 1200 खाती सुरु केली. त्याच बरोबर 3 लाखापेक्षा जास्त रकमेचा PLI जीवन विमा काढला, तसेच 40 अपघाती विमा काढुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 रा क्रमांक मिळवला.
ह्या सर्व कामाची दखल घेत भारतीय डाक विभाग आयोजित ग्रामीण डाक सेवकांच्या संमेलनात कार्तिक यांचा विशेष सन्मान महाराष्ट्र व गोवा परिमंडळाचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल अधिकारी रामचंद्र जायभाये यांच्या हस्ते, तसेच निदेशक डाक सेवा अधिकारी पणजी गोवा रमेश पाटील व सुप्रीटंडन पोस्ट अधिकारी नंदकुमार कुर्लपकर यांच्या प्रमुख उपस्थितीतू करण्यात आला.
ह्या सन्मानमागचे श्रेय हे झोळंबे गावातील सर्वांचे असल्याचे कार्तिक यांनी सांगितले. सन्मानामुळे जबाबदारी अजुन वाढली असून सर्वांच्या सहकार्याने भविष्यातील सेवा अशी चालू ठेवण्याचा प्रयत्न राहील असा विश्वास या प्रसंगी त्यांनी व्यक्त केला. या विशेष सन्माना बद्दल झोळंबे गावातील सर्वांकडून कार्तिक यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .














