
कणकवली : कणकवली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जुन्या भाजी मार्केट (आरक्षण क्र. ५) च्या जागेचा कायापालट करण्याचा मार्ग अखेर पूर्णपणे मोकळा झाला आहे. या आरक्षित शासकीय भूखंडाचा ताबा कणकवली नगरपंचायतीकडे हस्तांतरित करण्यास सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृत मंजुरी दिली आहे. नियमानुसार ठरवण्यात आलेली १९ लाख ४३१ रुपये इतकी कब्जा हक्क रक्कम (बाजारमूल्य) नगरपंचायतीने भरल्यानंतर या जागेचा ताबा नगरपंचायतीला मिळणार आहे.या जागेचा ताबा नगरपंचायतीकडे मिळावा आणि जुन्या भाजी मार्केटच्या जागेचा योग्य पद्धतीने विकास व्हावा, यासाठी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर हे सातत्याने प्रयत्नशील होते. त्यांनी याबाबत अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधत प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला होता.
त्यांच्या या पाठपुराव्यामुळे संबंधित जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पुढे सरकली असून आता जिल्हा प्रशासनाकडून त्यास मंजुरी मिळाली आहे.कणकवली (ता. कणकवली) येथील स.नं./हि.नं. १९८ व १ पैकी ०.०३.९५ हे.आर. (नगर भूमापन क्रमांक १४६९, १४७०, १४७१, १४७३/१ व १४७७ असे एकूण ३९५.१० चौ.मी. क्षेत्र) ही जागा जुने भाजी मार्केट (आरक्षण क्र. ५) म्हणून आरक्षित आहे. ही जागा ताब्यात घेऊन तेथे अद्ययावत भाजी मार्केट विकसित करण्यासाठी नगरपंचायतीने जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.
मुख्याधिकारी, नगरपंचायत कणकवली यांच्या मागणी प्रस्तावाचा आधार घेत जिल्हा प्रशासनाने या जागेच्या हस्तांतरणास मान्यता दिली आहे. नगरपंचायतीकडून १९,००,४३१ रुपये (अक्षरी : रुपये एकोणीस लाख चारशे एकतीस मात्र) ही रक्कम शासकीय खात्यात जमा करून घेऊन जागेचा ताबा नगरपंचायतीकडे सोपवण्याचे आदेश तहसीलदार, कणकवली यांना देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे कणकवली शहरातील जुन्या भाजी मार्केटच्या जागेवर नवीन व्यापारी संकुल तसेच नागरिक व विक्रेत्यांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे स्थानिक विक्रेते आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
ताजी बातमी
View all

झोळंबे शाखा डाकपाल कार्तिक जारवाल याà¤.....
September 29, 2026

Crime News : १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्à.....
September 29, 2026

Ration Card e-KYC Update : ६ महिने रेशन घेतले नसेल तर कà.....
September 29, 2026

Regal ITI Students Industrial Visit : रिगल आयटीआयच्या विद्या.....
September 29, 2026









