
सावंतवाडी : तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर गेल्या काही महिन्यांपासून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी जयदेव विठ्ठल म्हाडगूत याच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताचे दुकान असून त्याने अल्पवयीन मुलीला दुकानात बोलावून आत नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ही मुलगी दुकानात आली नसल्याने संशयित आरोपी तिला बोलावण्यासाठी तिच्या घरी गेला असता त्यावेळी मुलगी घाबरली.
त्यानंतर तिने धाडस करून घडलेली हकीगत आपल्या आईला सांगितली. यानंतर तिच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी संशयित आरोपी जयदेव विठ्ठल म्हाडगूत याला अटक केली. त्याच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










