LIVE UPDATES

Sawantwadi crime news : सावंतवाडी पोलिसांचा जुगारावर छापा

क्लबच्या नावाखाली चालत होता जुगार अड्डा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 28, 2026 20:37 PM
views 130  views
gambling

सावंतवाडी : शहरातील माठेवाडा भागात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या सोशल व स्पोर्ट्स क्लबवर सावंतवाडी पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली. आज दुपारी अचानक छापा टाकत रमी नावाचा जुगार खेळणाऱ्या ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून ४४ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम, ७ दुचाकी, १२ मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 

माठेवाडा येथील एका घरात क्लबच्या नावाखाली जुगार अड्डा चालवला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या घरावर धाड टाकली असता तेथे काही जण जुगार खेळताना आढळले. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात रूपेश सावंत ( खेळी मांडणारा ), गौरव गावडे, अखिल बडीवले, पुंडलिक सावंत, जेरॉन रॉड्रिक्स, सुनील सावंत, संतोष राऊळ, संजय गोंदावळे, शंकर सावंत, प्रभाकर कदम आणि रामकृष्ण आडके अशा ११ संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत.

ही धडक कारवाई सावंतवाडी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस अंमलदार श्री. धोत्रे आणि दीपक शिंदे यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत