LIVE UPDATES

IND vs AFG T20I series : अफगाणिस्तान मालिकेसोबतच आशियाई क्रीडा स्पर्धेतून हर्षित राणा 'बाहेर', त्याच्या जागी खेळणार विदर्भातील 'हा' खेळाडू

Yash Thakur replaces Harshit Rana : रविवारी १३ सप्टेंबरपासून अफगाणिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका सुरु होत आहे. तसेच या महिन्याच्या अखेरीस आशियाई क्रीडा स्पर्धा पार पडणार आहे. वेगवान गोलंदाज हर्षित राणा टी-२० मालिका आणि आशियाई क्रीडा स्पर्धा या दोन्ही स्पर्धांमधून बाहेर पडल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
Edited by: Rajat Sawant
Published on: September 10, 2026 14:25 PM
views 77  views
harshit rana Team India

मुंबई : वेगवान गोलंदाज हर्षित राणा टी-२० मालिका आणि आशियाई क्रीडा स्पर्धा या दोन्ही स्पर्धांमधून बाहेर पडला आहे. ७ सप्टेंबर रोजी एका 'मॅच सिम्युलेशन' दरम्यान गोलंदाजी करताना त्याला 'रेक्टस फेमोरिस' स्नायूची दुखापत झाल्याने त्याला संघातून बाहेर पडावे लागले. त्याच्या जागी विदर्भाचा २७ वर्षीय वेगवान गोलंदाजाची निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती बीसीसीआयने जाहीर केली आहे.

रविवारी १३ सप्टेंबरपासून अफगाणिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका सुरु होत आहे. तसेच या महिन्याच्या अखेरीस आशियाई क्रीडा स्पर्धा पार पडणार आहे. वेगवान गोलंदाज हर्षित राणा टी-२० मालिका आणि आशियाई क्रीडा स्पर्धा या दोन्ही स्पर्धांमधून बाहेर पडल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

निवड समितीने अफगाणिस्तानविरुद्धची टी २० मालिका आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी राणाची जागा घेण्यासाठी वेगवान गोलंदाज यश ठाकूरचा संघात समावेश केला आहे. २७ वर्षीय यश ठाकूरने भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यादरम्यान टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या वर्षी जुलैमध्ये पदार्पण केले होते. आयपीएलमध्येही त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये यश ठाकूरने ५० सामने खेळले असून ७.०४ च्या प्रभावी इकॉनॉमी रेटसह ८१ विकेट्स घेतल्या आहेत.


अफगाणिस्तान टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), टिळक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि यश ठाकूर

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वैभव सूर्यवंशी आणि यश ठाकूर.