LIVE UPDATES

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोनच्या विद्यार्थ्यांचे यश

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 08, 2026 17:45 PM
views 51  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : १४, १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धा व्ही . एन . नाबर इंग्लिश मेडीयम स्कूल , बांदा येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या इयत्ता आठवीतील कु. सोहम देशमुख याने उत्कृष्ट बुद्धिबळ कौशल्याचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला व जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली. तर कु. शौर्य चव्हाण याने पाचवा क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी बाजावली.

 सोहम व शौर्य यांनी स्पर्धेदरम्यान एकाग्रता, चातुर्य, संयम आणि योग्य डावपेचांचा प्रभावी वापर करत आपल्या खेळाची छाप पाडली. त्यांच्या या यशामुळे स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.

 या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे संचालक रुजुल पाटणकर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. निधी सावंत, शिक्षकवृंद व विद्यार्थी यांनी कु. सोहम देशमुख आणि कु. शौर्य चव्हाण यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.