
मुंबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका १३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. हे सर्व सामने नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले जातील. दुसरा सामना १५ सप्टेंबरला, तर तिसरा सामना १७ सप्टेंबरला होणार आहे. या मालिकेचे यजमानपद अफगाणिस्तानकडे आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात ईशान किशन, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांचा समावेश आहे, तर जसप्रीत बुमराह आणि हर्षित राणा यांचा सहभाग त्यांच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असेल. दरम्यान, स्टार अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीतून पूर्णपणे सावरला असून, त्याला खेळण्यासाठी तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे.
दुसरीकडे, इब्राहिम झद्रानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तान संघात रशीद खान, रहमानुल्ला गुरबाज, सेदिकुल्ला अटल आणि अजमतुल्ला ओमरझाई यांसारख्या बड्या खेळाडूंचा समावेश आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकांचे सामने प्रेक्षक सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात. भारत-अफगाणिस्तान मालिकेचे प्रसारण हक्क सोनी पिक्चर्स नेटवर्क्सने मिळवले आहेत. तिन्ही टी-२० सामने संध्याकाळी ७ वाजता सुरू होतील.
भारताचा टी २० संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, इशान किशन, टिळक वर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती.
अफगाणिस्तानचा टी २० संघ
इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानुल्ला गुरबाज (यष्टिरक्षक), नूर रहमान (यष्टिरक्षक), अब्दुल्ला अहमदझाई, नवीन-उल-हक, सेदिकुल्ला अटल, दरविश रसुली, अजमतुल्ला ओमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, राशिद खान, नांगेयालिया खरोटे, नूर अहमद, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी.














