
वैभववाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत अर्जुन रावराणे विद्यालयाच्या १४ वर्षांखालील मुलांच्या कबड्डी संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत हा संघ तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
तालुकास्तरीय पावसाळी क्रिडा स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या.यामध्ये १४वर्षीय वयोगटात अ.रा.विरालयाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली.अंतिम सामन्यात अर्जुन रावराणे विद्यालयाच्या संघाने कोळपे उर्दू हायस्कूलच्या संघावर मात करत विजेतेपदाला गवसणी घातली. या विजयामुळे विद्यालयाचा संघ आगामी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
संघाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी. एस. नादकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.छ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघाला शुभेच्छा दिल्या.संघाच्या यशात क्रीडा शिक्षक संदेश तुळसणकर, आर. बी.चौगुले यांच मोलाचं सहकार्य लाभले.
ताजी बातमी
View all

IND vs AFG T20I series : अफगाणिस्तान मालिकेसोबतच आश.....
September 10, 2026

new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो म.....
September 10, 2026

गणेशोत्सव काळात नेटवर्क समस्यांसाठी .....
September 10, 2026

जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत भोस.....
September 10, 2026
संबंधित बातम्या
View all

IND vs AFG T20I series : अफगाणिस्तान मालिकेसोबतच आश.....
September 10, 2026

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत स्टे.....
September 08, 2026

IND vs AFG T20I series : क्रिकेट चाहत्यांना 'येथे' पा.....
September 08, 2026

IND vs AFG T20I Series : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-.....
September 02, 2026






