LIVE UPDATES

Womens Asia Cup 2026 : क्रिकेटच्या मैदानात भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने

Women's Asia Cup 2026 IND Vs PAK : स्पर्धेत भारत विरुध्द पाकिस्तान संघाचा हाय व्होल्टेज सामना क्रिकेट रसिकांना पाहता येणार आहे. २०२६ च्या महिला आशिया चषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 07, 2026 19:09 PM
views 129  views
ind vs pak match 5 september

मुंबई : महिला आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही स्पर्धा २८ ऑगस्ट रोजी सुरु होणार असून अंतिम सामना 13 सप्टेंबरला खेळवला जाईल. ही स्पर्धा टी 20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत 8 संघ सहभागी होणार असून त्यांची दोन गटांमध्ये विभागणी केली जाईल. याबाबतची माहिती आशियाई क्रिकेट परिषदेने गुरुवारी जाहीर केली.

दरम्यान, या स्पर्धेत भारत विरुध्द पाकिस्तान संघाचा हाय व्होल्टेज सामना क्रिकेट रसिकांना पाहता येणार आहे. २०२६ च्या महिला आशिया चषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण सामना ५ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. महिला आशिया चषकाची ही सहावी आवृत्ती असेल. सहभागी आठ संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. यामधील 'गट अ' मध्ये भारत, पाकिस्तान, थायलंड, हाँगकाँग आणि चीन यांचा समावेश आहे. तर 'गट ब' मध्ये श्रीलंका, बांगलादेश, यूएई आणि इंडोनेशिया यांचा समावेश आहे.

स्पर्धेचा पहिला सामना थायलंड आणि हाँगकाँग यांच्यात खेळवला जाईल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील आणि अंतिम सामना १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर फ्लडलाइट्सच्या प्रकाशात खेळवले जातील.

महिला आशिया चषक २०२६ साठी भारताचे वेळापत्रक

  • भारत विरुद्ध थायलंड - ३० ऑगस्ट
  • भारत विरुद्ध हाँगकाँग - ३ सप्टेंबर
  • भारत विरुद्ध पाकिस्तान - ५ सप्टेंबर