
सावंतवाडी : पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची केसरी येथील कोकणातील पहिले मत्स्यालय केएसआर ग्लोबल एक्वेरियमला भेट दिली. यावेळी माजी सरपंच विनोद राऊळ यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच पोलीस निरीक्षकांना संपूर्ण परिसराची माहिती देत विविध आकर्षणे व उपक्रमांची पाहणी करून दिली. यावेळी परिसराच्या विकासाबाबत तसेच पर्यटनवाढीच्यादृष्टीने सुरू असलेल्या उपक्रमांबाबतही चर्चा झाली.











